शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी आई-वडील खोलीच्या बाहेरच आले नाही; मुलाने ग्रामस्थांसह दरवाजा तोडताच बसला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 14:00 IST

पती-पत्नीची गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालम तालुक्यातील पूयनी येथे उघडकीस आली आहे. 

पालम (परभणी ) : तालुक्यातील पुयनी येथील पती-पत्नीने गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही घटना 10 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. सुनिता रंगनाथ शिंदे आणि रंगनाथ असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सकाळी त्यांच्या मुलाने आई-वडील दरवाजा उघडत नसल्याचे पाहून ग्रामस्थांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर हे धक्कादायक चित्र समोर आले.

पुयनी येथील रंगनाथ हरिभाऊ शिंदे (वय 40) आणि सुनिता रंगनाथ शिंदे (वय 35) यांच्या खोलीचे दार सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत उघडले नव्हते. शेतातून आल्यावर त्यांचा मुलगा अंगद याने आई-वडील झोपलेल्या खोलीचा दरवाजा वाजविला. बऱ्याच वेळानंतरही खोलीतून आवाज आला नाही. म्हणून मुलाने ग्रामस्थांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दोघांनीही घराच्या छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. 

घटनेची माहिती पुयनी येथील पोलीस पाटील गेंदे यांच्यामार्फत पालम पोलिसांना देण्यात आली. पालम ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहत्तरे, फौजदार विनोद साने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह पालम ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. सकाळी ९.३० वाजेपर्यंत या घटनेची नोंद पालम पोलिसात झालेली नव्हती.

पूर्णा तालुक्यात नवदाम्पत्याने संपवले जीवनलग्नात आयुष्यभर साथ देण्याचे एकमेकांना वचन देणाऱ्या नवविवाहित दाम्पत्याने सहा महिन्यातच टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपविल्याची घटना रविवारी सकाळी पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर येथे उघडकीस आली आहे. गंगाधर विश्वनाथ चापके (२५) आणि सपना गंगाधर चापके (२१) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. गंगाधर चापके आणि सपना चापके यांचा साधारणत: सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच अवघ्या काही महिन्यातच या दोघांनीही विष प्राशन करून मृत्यूला कवटाळल्याने गावात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - आयुष्यभराची साथ सहा महिन्यातच तुटली; हातावरची मेहंदी उतरण्यापूर्वीच जोडप्याचा टोकाचा निर्णय

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू