लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील वसमत रस्त्यावर एका कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास घडली़ अग्नीशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर साधारणत: अर्ध्या तासाने आग आटोक्यात आली़ त्यामुळे अनर्थ टळला़शहरातील वसमत रोडवर एका गॅरेजवर दुरुस्तीसाठी आणलेली गाडी रस्त्याच्या कडेला लावली होती़ शुक्रवारी रात्री १०़३० च्या सुमारास या गाडीने अचानक पेट घेतला़ त्यामुळे आगीचे मोठे लोट निघाले़ ही माहिती अग्नीशमन दलाला देण्यात आली़ काही वेळातच अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला व आग आटोक्यात आणली़ विशेष म्हणजे या गाडीला गॅस सिलेंडर लावले होते़ वेळेतच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला़ घटनेमुळे परिसरात बघ्याची गर्दी जमली होती़ त्यामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती़
परभणीत कार पेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:37 IST