शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत आंदोलन: पेन्शनसाठी २१ जणांचे मुंडन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:41 IST

मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीच्या वतीने २२ जून रोजी दुपारी १ वाजता २१ जणांनी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मासिक पेंशन ७५०० रुपये व महागाई भत्ता त्वरित लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय ई.पी.एस.१९९५ संघर्ष समितीच्या वतीने २२ जून रोजी दुपारी १ वाजता २१ जणांनी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.३१ मे २०१७ ला ई. पी.एफ.ओने काढलेले परिपत्रक रद्द करुन सुप्रिम कोर्टाच्या निकालाप्रमाणे पूर्ण पगारावर पेंशन निवडीची संधी देण्यात यावी, पेंशन मिळत नसलेल्या निवृत्त कामगारांना ईपीएस १९९५ च्या योजनेत सामील करुन पेंशन लागू करावे, मा.खा.भगतसिंग कोशियारी यांच्या अहवालानुसार ५ हजार रुपये प्रमाणे पेंशन व महागाई भत्ता लागू करावा आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय ईपीएस १९९५ संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने व म्हणणे मांडून पाठपुरावा करण्यात आला.मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता ई.पी.एस.१९९५ चे संघर्ष समितीचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या मैदानात जमा झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून एक दिवसीय लाक्षणीक उपोषण सुरु केले.उपोषणा दरम्यान दुपारी दीड वाजता २१ जणांनी आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मुंडन करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनात डी.पी.बेंडे, पी.डी.चामणीकर, अनंतकुमार पेडगावकर, यादव पतंगे, जी.आर.चोढे, टी.जी.आवटे, एम.पी.सिराळे, एस.टी.जाधव, व्ही.आर.काळे, अप्पाराव देशमुख, पी.आर. देशमुख, हेमंत जोशी यांचा सहभाग होता.प्रशासनाला: निवेदनपरभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी एक वाजल्यापासून मुडंन आंदोलनास सुरुवात झाली.यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंडन केले व संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यावेळी पदाधिकाºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीMONEYपैसा