शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

परभणी : न्यायालयीन प्रक्रियेत अडकली ४ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:22 IST

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांना पारेषण विरहित सौर विद्युत संच बसविण्यासाठी आलेला ४ कोटी ९ लाख ६५ हजार २१० रुपयांचा निधी प्रशासकीय गोंधळामुळे ठप्प पडला आहे़ या कामाच्या निविदा मंजूर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अपात्र असलेल्या निविदा धारकास पात्र ठरविल्याने हे प्रकरण आता न्यायालयात दाखल झाले असून, सद्यस्थितीला प्रक्रिया ठप्प पडली आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत प्राथमिक शाळांना पारेषण विरहित सौर विद्युत संच बसविण्यासाठी आलेला ४ कोटी ९ लाख ६५ हजार २१० रुपयांचा निधी प्रशासकीय गोंधळामुळे ठप्प पडला आहे़ या कामाच्या निविदा मंजूर करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अपात्र असलेल्या निविदा धारकास पात्र ठरविल्याने हे प्रकरण आता न्यायालयात दाखल झाले असून, सद्यस्थितीला प्रक्रिया ठप्प पडली आहेत़जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सोलार बसविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून परभणी जि़प़ला ४ कोटी ९ लाख ६५ हजार २१० रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ सुमारे ४०० शाळांमध्ये १ किलो वॅटपर्यंतचे पारेषण विरहित सोलार बसविण्यासाठी जिल्हा परिषदेने ६ आॅक्टोबर २०१८ रोजी निविदा मागविल्या़ ५ नोव्हेंबर ही निविदा अंतीम करण्याची तारीख होती़ ६ नोव्हेंबर २०१८ ही लिफाफा उघडण्याची तारीख होती़ परंतु, प्रत्यक्षात १५ दिवस उशिराने १३ नोव्हेंबर रोजी दाखल निविदांचे लिफाफे उघडण्यात आले़ या निविदेसाठी एकूण ५ कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या़ त्यात बालाजी एंटरप्रायजेस औरंगाबाद, स्पेस सोलार शॉपी औरंगाबाद, पॉवर कॉम इलेक्ट्रॉनिक औरंगाबाद, लिबर्टी इलेक्ट्रॅनिक पुणे आणि केएसपी इंडस्ट्रीज परभणी यांचा समावेश होता़ दरम्यान, दाखल निविदांपैकी लिबर्टी इलेक्ट्रॉनिक पुणे यांची निविदा सुरुवातीलाच अपात्र ठरविण्यात आली़ उर्वरित ४ निविदांपैकी केएसपी इलेक्ट्रॉनिक परभणी यांची निविदा लेखाधिकारी आणि लिपिकांनी अपात्र ठरविली होती़ त्यामुळे शिल्लक राहिलेल्या तीन निविदांमधून प्रक्रिया होणे अपेक्षित होते़ मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज आणि प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी अपात्र ठरविलेली केएसपी इंडस्ट्रीज यांची निविदा पात्र ठरविली आणि याच कारणावरून ही निविदा प्रक्रिया रखडली आहे़केएसपी इंडस्ट्रीजची निविदा पात्र ठरविल्याने औरंगाबाद येथील बालाजी एंटरप्रायजेसने या निर्णयाविरूद्ध परभणी येथील न्यायालयात अपिल दाखल केले़ २१ डिसेंबर रोजी या अपिलावर सुनावणी झाली आणि निविदा प्रक्रियेला २ जानेवारीपर्यंतची स्थगिती देण्यात आली आहे़ जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे़ मात्र तरीही प्रत्यक्ष कामे रखडली आहेत़ मागील वर्षीच्या नाविन्यपूर्ण योजनेमध्ये हा निधी मिळाला असून, अधिकाºयांच्या धोरणामुळे ही निविदा प्रक्रिया रखडली़ परिणामी शाळांच्या भौतिक विकासालाही खीळ बसली आहे़़़़तर लॅप्स होऊ शकतो निधीजिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेत १ किलोवॅट आॅफग्रीड सोलार पॉवर पॅक व साहित्य पुरवठा करण्यासाठी हा निधी उपलब्ध झाला होता़ जि़प़ने यासाठी निविदाही मागविल्या होत्या़ परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतर निविदा प्रक्रियेला २ जानेवारीपर्यंत स्थगिती मिळाली आहे़ आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत़ मार्च महिन्यापर्यंत या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे़ अशा परिस्थितीत निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही तर हा निधी अखर्चित राहू शकतो़ परिणामी निधी शासनाला परत करण्याची नामुष्कीही ओढावण्याची वेळ येऊ शकते़असे आहे योजनेचे स्वरुपनाविन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेकडील शाळांमध्ये ई-लर्निंगद्वारे मॉडेल क्लासरुम तयार करण्याच्या अंतर्गत १ केडब्ल्यूपी आॅफग्रीड सोलार पॉवर पॅक बसविला जाणार आहे़ सुमारे ४०० शाळांमध्ये हे काम केले जाणार आहे़ योजनेसाठी २०१८-१९ या एका वर्षाचा कालावधी आहे़ या योजनेमुळे ग्रामीण भागातील शाळांना शैक्षणिक व भौतिक सुविधांची पूर्तता होणार आहे़ परंतु, निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे या शाळांमध्ये सोलार बसविण्याची प्रक्रिया सध्या तरी न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani z pपरभणी जिल्हा परिषदCourtन्यायालयSchoolशाळा