शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

परभणीत होणार अद्ययावत बसपोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:14 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्टॅॅण्डचे अद्ययावत बसपोर्टमध्ये रुपांतर होणार असून यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी येथील बसस्टॅॅण्डचे अद्ययावत बसपोर्टमध्ये रुपांतर होणार असून यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.परभणी बसस्थानकाची सातत्याने दूरवस्था होत असल्याने या बसस्थानकाचे अद्यावतीकरण करण्याची संकल्पना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही महिन्यांपूर्वी मांडली होती. त्यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सद्यस्थितीमध्ये या बसस्थानकात पावसाळ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे आतील प्रवाशांना बसस्थानकाबाहेर येता येत नाही आणि बाहेरील प्रवाशांना आतमध्ये जाता येत नाही, अशी गंभीर परिस्थिती पावसाळ्यात अनेक वेळा पहावयास मिळाली. त्यामुळे या बसस्थानकाचे बसपोर्टमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतला. या संदर्भात माहिती देताना आ.डॉ. पाटील म्हणाले की, सद्यस्थितीमध्ये येथे १० प्लॅटफॉर्म आहेत. ते ८ ने वाढवून नियोजित बसस्थानकात १८ प्लॅटफॉर्म असतील. त्यात १३ आयडॉल प्लॅटफॉर्म असतील. नवीन बसस्थानक हे १३०० चौरस मीटर जागेवर प्रस्तावित असून या बांधकामाचे दोन्ही मजल्याचे क्षेत्रफळ ३६४४ चौरस मीटर एवढे आहे. प्रस्तावित इमारतीमध्ये तळमजल्यावर प्रतीक्षा कक्ष, आरक्षण कार्यालय, बँक, एटीएम, नियंत्रण कक्ष, कॅन्टीन, पार्सल रुम, प्रवाशांसाठी शौचालय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग आदींसाठी जागा ठेवण्यात येणार आहे.पहिल्या मजल्यावर अधिकारी, चालक व वाहक यांना आराम करण्यासाठी विश्रांती कक्ष राहणार असून येथे एस.टी. बँकेसाठी जागाही ठेवण्यात येणार आहे. बसस्थानकात एलईडी स्क्रिन, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजीटल डिस्प्ले बोर्ड आदींची व्यवस्था केली जाणार आहे. या इमारतीच्या कामासाठी औरंगाबाद येथील वास्तू विशारद डी.पी. डिझायनर असोसिएट् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात १३ कोटी ४ लाख ४८ हजार ५९५ रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यास मंजुरी मिळाली आहे.या अंदाजपत्रकात बसस्थानक इमारत बांधकामासाठी ५ कोटी ९४ हजार १०३ रुपये, कुंपन भिंत व रस्ता कामासाठी ३ कोटी ६२ लाख १० हजार ४१२ रुपये, सेफ्टीक टँक व प्लबिंग सिस्टीमसाठी ३ लाख ५० हजार ९५३ रुपये, स्टार्म वॉटर ड्रेनेज सिस्टीमसाठी ७ लाख ६१ हजार ३०८ रुपये, बसस्थानकात स्टेलनेस स्टील चेअर्स, टेन्साईल स्ट्रक्चर, अ‍ॅल्यूमिनियम काँम्पोजीट पॅनल वर्कसाठी ९३ लाख ५९ हजार ५३२ रुपये, विद्युत कामासाठी ८९ लाख ८४ हजार ४३८ रुपये तसेच जीएसटी, वास्तुविशारद शुल्क आदींसाठीही निधींची तरतूद करण्यात आली असल्याचे आ.डॉ.पाटील यांनी सांगितले.झरीलाही नवीन बसस्थानकपरभणी तालुक्यातील झरी येथे मोठी बाजारपेठ आहे. या गावाला अनेक खेडी जोडली गेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने झरी येथे नवीन सुसज्ज असे बसस्थानक तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महामंडळाने २३ लाख ९५ हजार रुपयांचा निधीही उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे परभणी व झरी येथील बसस्थानकाचा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.ं