शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गळा आवळून पत्नीचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:08 IST

मानलेल्या आईचा सासऱ्याने खून केल्याचा बदला म्हणून एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील हडको भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मानलेल्या आईचा सासऱ्याने खून केल्याचा बदला म्हणून एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील हडको भागात बुधवारी सकाळी उघडकीस आली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी- परभणीतील पंचशीलनगर भागातील मयुरी चंद्रकांत वाकोडे (१९) या तरुणीस १७ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपी आनंदा खंदारे (२२) याने पळवून नेले होते. या प्रकरणी त्याच दिवशी कोतवाली पोलीस ठाण्यात आनंदा खंदारे याच्या विरोधात मयुरीची आई संगिता वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. मुलीला पळवून नेल्याचा राग तिचे वडील चंद्रकांत वाकोडे यांच्या मनात होता. या रागातून १८ नोव्हेंबर २०१७ रोजी चंद्रकांत वाकोडे यांनी आनंदाची मानलेली आई गयाबाई खंदारे यांचा चाकूने भोसकून खून केला होता. याचा राग आरोपी आनंदा खंदारे याच्या मनात होता. या प्रकरणी चंद्रकांत खंदारे यांना पोलिसांनी अटक करुन त्यांची जेलमध्ये रवानगी केली. याच प्रकरणात मयुरी वाकोडे हिची आई संगिताबाई हिलाही पोलिसांनी अटक केली होती. सहा महिन्यांपूर्वी संगिताबाई या जामिनावर सुटल्या होत्या. दरम्यानच्या काळात आनंदा आणि मयुरी हे सहा महिन्यांपूर्वी शहरातील हडको भागातील अजिंठानगर भागात राहण्यास आले होते. ते एकत्र राहत होते. यावेळी आनंदा हा मयुरीला त्रास देत होता. त्याच्या मनात त्याच्या आईचा मयुरीच्या वडिलांनी खून केल्याचा राग कायम होता. याच वादातून मंगळवारी रात्री आरोपी आनंदा याने मयुरी खंदारे हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो फरार झाला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. तपासाअंती आरोपी आनंदा खंदारे फरार असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संगिताबाई वाकोडे यांच्या फिर्यादीवरुन आनंदा खंदारे याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर हे करीत आहेत.दरम्यान, आरोपी आनंदा खंदारे हा पत्नीचा खून करुन पूर्णा- हैदराबाद रेल्वेने उदगीरपर्यंत गेला. उदगीरमध्ये उतरुन तो परत पूर्णा येथे जाण्यासाठी रेल्वेत बसला. नानलपेठ पोलिसांना गुप्त सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याला परभणी स्थानकावर पॅसेंजर रेल्वेच्या डब्यातून नानलपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाMurderखून