शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

परभणी: रबी हंगामात १७९ कोटींचे पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:10 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत व्हावी, यासाठी रबी हंगाम २०१८-१९ साठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी २२ हजार २३३ शेतकऱ्यांना १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्यामुळे यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचे दिसून येत आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षात बँकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करताना पुढाकार घेतला होता. त्यामुळे कर्ज वाटपाची टक्केवारी १०२ टक्क्यांपर्यंत गेली होती; परंतु, २०१८-१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकºयांना खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद व कापूस या पिकांतून उत्पन्नच मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना बँका दुष्काळी परिस्थितीत पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करून आर्थिक मदत करतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार २०१८-१९ या वर्षासाठी राज्य शासनाने ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यामध्येही जिल्ह्यातील वाणिज्य बँकांनी १२ हजार २२ शेतकºयांना १२१ कोटी ५३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी ९०३ शेतकºयांना १५ कोटी ३ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ३ हजार ६८३ शेतकºयांना २७ कोटी २३ लाख, जिल्ंहा मध्यवर्ती बँकेने ५ हजार ६२५ शेतकºयांना १५ कोटी ३७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे बँकांनी शेतकºयांची परिस्थिती लक्षात न घेता जिल्ह्यातील २२ हजार ३२३ शेतकºयांना केवळ १७९ कोटी १६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे.त्यामुळे गतवर्षी जिल्ह्याचा पीक कर्ज वाटपाचा आलेख यावर्षी मात्र केवळ ५० टक्यावरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे बँकांनी पीक कर्ज वाटप करताना घेतलेला आखडता हात शेतकºयांना आर्थिक कोंडीत ढकलणाराच दिसून येत आहे.खरीप : हंगामही ३० टक्क्यांवर४जिल्ह्यातील बँकांनी यावर्षी खरीप पाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटप करताना आखडा हात घेतल्याचे दिसून येत आहे.४२०१८-१९ या आर्थिक वर्षातील खरीप हंमागासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकांनी ८३ हजार ३८५ शेतकºयांना ४४० कोटी २७ लाख रुपयांचे वाटप केले आहे. त्याची टक्केवारी केवळ ३०.५ टक्के आहे.४त्यामुळे बँकांनी खरीप हंगामापाठोपाठ रबी हंगामातही पीक कर्ज वाटपाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीbankबँक