शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

परभणी: सीएम काय देणार? जिल्हावासियांना उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:03 IST

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे आपल्या दौऱ्यात ठोस घोषणा करतील, त्यांच्या दौºयातून येथील मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन एमआयडीसीचे भिजत घोंगडे पुढे सरकते का, या विषयी जिल्हावासियांना आता उत्सुकता लागली आहे.पावसाअभावी दुष्काळाच्या छायेत असलेल्या या परभणी जिल्ह्यात गुरुवारी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस हे जिंतूर, सेलू आणि परभणी या तालुक्यांचा दौरा करणार आहेत. त्याचप्रमाणे परभणीत मुक्कामी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासप्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून ठोस घोषणा होईल, अशी जिल्हावासियांना अपेक्षा आहे.शैक्षणिक, औद्योगिक, कृषी आणि आरोग्याच्या संदर्भाने जिल्हा अविकसित आहे़ या पार्श्वभूमीवर या जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची अपेक्षा येथील नागरिक बाळगून आहेत़ जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी तसेच गंभीर आजारावरील उपचार जिल्ह्यातच उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी मागील काही वर्षांपासून लावून धरली जात आहे़ यासाठी जिल्हाभरात जनआंदोलनही उभे राहिले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली खरी़ मात्र त्या पुढे कुठलीही हालचाल झाली नाही़ वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जागेची निश्चिती, महाविद्यालयातील पदनिर्मिती यासह प्रत्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रक्रिया संथगतीने आहे़ त्यामुळे या प्रश्नाला चालना देण्यासाठी कालमर्यादा ठेऊन ठोस घोषणा करणे अपेक्षित आहे़ तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी परभणी शहरालगत नवीन एमआयडीसीला मंजुरी मिळाली आहे़ मात्र दोन वर्षांपासून हा प्रश्नही रखडलेला आहे़ बोरवंड परिसरात एमआयडीसीसाठी जमीन अधिगृहित करण्याचे कामही अद्याप झाले नाही़ शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा निश्चित नसल्याने हा प्रश्न रखडला आहे़त्यामुळे मावेजाची घोषणा करून एमआयडीसीसाठी जागा अधिग्रहित करून प्रत्यक्ष एमआयडीसी उभारणीला सुरुवात केली तर जिल्ह्यातील रोजगाराचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो; परंतु, राजकीय उदासिनतेमुळे केवळ घोषणाच झाल्या असून, घोषणा झालेले प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने जिल्ह्याचा विकासही संथगतीने होत आहे़ याशिवाय सिंचनासाठी भरीव निधी विजेच्या समस्या, कृषीप्रधान उद्योगांना चालना देणे या प्रश्नांबरोबरच शेतकºयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत़ त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़मागील घोषणाचीही संथ अंमलबजावणी४जिल्ह्यात रस्त्यांचे प्रश्न गंभीर आहेत़ गंगाखेड रस्त्याचा प्रश्न तर येथील खड्ड्यामुळे राज्यभरात गाजला होता़ मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे परभणी जिल्ह्याच्या दौºयावर आले होते़ त्यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते अनेक रस्त्यांच्या कामांचे ई-उद्घाटन करण्यात आले़ गंगाखेड आणि जिंतूर रस्त्यांचा दर्जा वाढवून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली़४त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोट्यवधी रुपयांच्या निधीची कामे जिल्ह्यात सुरू होत असल्याचे सांगितले़ प्रत्यक्षात उद्घाटनानंतर प्रमुख रस्त्यांची कामेच अतिशय संथगतीने होत आहेत़ वर्षभरापासून गंगाखेड आणि जिंतूर रस्ता खोदून ठेवला असून, काम अद्याप पूर्ण झाले नाही़ त्यामुळे मुख्यमंत्री या प्रश्नांतही लक्ष घालतील, अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस