शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : साडेचारशे गावांना पाणीटंचाईचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:19 IST

जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात परतीचा पाऊस झाला नसल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून, सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते़ असा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी दिला आहे़ त्यामुळे जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़जिल्ह्यामध्ये यापूर्वीच्या हंगामात पावसाची सरासरी कमी असली तरी संपूर्ण हंगामात पाऊसच झाला नाही, अशी परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली नव्हती़ परंतु, यावर्षी परतीचा पाऊस झालाच नाही़ सुरुवातीच्या काळात झालेल्या कमी अधिक पावसावरच प्रकल्पांमधील जलसाठ्यात पाणी जमा झाले आहे़ त्यामुळे उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरविण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे़ आॅक्टोबर महिन्यापासूनच टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही़ उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे़ या कारणांमुळे भूजल पातळीत मोठी घट झाली आहे़ जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विभागाने आॅक्टोबर ते जून या महिन्यापर्यंत पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या संभाव्य गावांची माहिती नुकतीच जिल्हा प्रशासनाला दिली आहे़ या माहितीच्या आधारे सुमारे ४६८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना संदर्भात प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे़भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये ३३ गावांमध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण होवू शकते़ त्यात पाथरी तालुक्यातील ११ आणि सेलू तालुक्यातील २२ गावांचा समावेश आहे़ जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या १४१ पर्यंत पोहचू शकते़ त्यामध्ये सेलू तालुक्यातील २०, गंगाखेड तालुक्यातील ५९, सोनपेठ ३४ आणि जिंतूर तालुक्यातील २८ गावांचा समावेश आहे़ तर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात आणखी २९४ गावांची टंचाईग्रस्त गावांमध्ये भर पडण्याची शक्यता या विभागाने वर्तविली आहे़ त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३५, पूर्णा ३३, सेलू १८, मानवत ४९, पालम ६३ आणि जिंतूर तालुक्यातील १०४ गावांचा समावेश आहे़एकंदर आॅक्टोबर महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांची संख्या ४६८ एवढी होण्याची शक्यताही या विभागाने वर्तविली आहे़ त्यामुळे परभणी तालुक्यातील ३५, पूर्णा ३३, पाथरी १९, सेलू ६०, मानवत ४१, गंगाखेड ५९, पालम ६३, सोनपेठ ३४ आणि जिंतूर तालुक्यातील १३२ गावांमध्ये टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़परभणी जिल्ह्यात सुमारे ८०४ गावे आहेत़ त्यापैकी ४६८ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तविली आहे़ ही बाब लक्षात घेता यावर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटीेने वाढली आहे़जिल्हा प्रशासनाला या गावांमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई थांबविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे़ प्रशासनाचे टंचाई कृती आराखडे तयार असले तरी सुक्ष्म नियोजन करून प्रत्यक्ष टंचाईग्रस्त गावांना लाभ देण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे़पाणी उपसा थांबवाजिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे़ असे असतानाही अनेक भागांत या पाण्याचा अवैध उपसा होत असून, हा उपसा थांबविण्यासाठी अधिकाºयांचे प्रयत्न कमी पडत आहेत़ जिल्ह्यात पथकांची स्थापना करण्यात आली असली तरी तलावांमधील पाण्याचा उपसा पूर्णत: थांबलेला नाही़ अवैध पाणी उपसा थांबविला तर उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस वापरणे शक्य होणार आहे़टंचाई निवारणालाच प्राधान्य देण्याच्या सूचनाजिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाई निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणाची कामे हाती घेतली आहेत. जिल्हास्तरावर बैठकाही पार पडल्या़ या बैठकांमध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकाºयांना टंचाईच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत़ सध्या जिल्ह्यामध्ये अनेक भागांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ काही गावांतील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे़ येथून पुढे परिस्थिती अधिकच गंभीर होणार असल्याने प्रशासनाने आतापासूनच या कामांना प्राधान्य देऊन टंचाईग्रस्त गावांत पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे़टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढणार४भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील ४६८ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे़ या विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील भूजल पातळीची नोंद घेऊन ही शक्यता वर्तविली आहे़ याशिवाय जिल्ह्यामध्ये इतर मार्गानेही पाणीटंचाई निर्माण होवू शकते़४त्यात ज्या प्रकल्पावर पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे, त्या प्रकल्पातील पाणीसाठा संपल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो़ तसेच पाणी पुरवठा करणाºया योजनेतील त्रुटी, जलवाहिनी नादुरुस्त असणे आदी कारणांमुळेही टंचाईची परिस्थिती निर्माण होवू श्कते़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी मागविली आहे़४परंतु, अद्यापपर्यंत जिल्हा परिषदेने अशा गावांची यादी प्रशासनाला उपलब्ध करून दिली नाही़ त्यामुळे कृत्रिम कारणास्तव टंचाई निर्माण झालेल्या गावांत उपाययोजना करताना प्रशासनाला अडचणींना सामोरे जावे लागणार आहे़ त्यामुळे संभाव्य टंचाईग्रस्त गावांची माहिती वेळेत देणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाई