शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘दुधना’च्या दोन्ही कालव्यात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:29 IST

प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : प्रदीर्घ प्रतीक्षा आणि नाट्यमय घडामोडीनंतर निम्न दुधना प्रकल्पातून रब्बीतील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांची लागवड करण्यासाठी उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास १२०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले. सेलू, मानवत, जिंतूर व परभणी या चार तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून रब्बीची पिके व जनावरांच्या चाºयासाठी एक पाणीपाळी सोडण्याची मागणी दबावगट व शेतकºयांनी केली होती. सेलू येथे रास्तारोकोही केला होता. त्यानंतर मुंबई येथे पाटबंधारे विभागाच्या बैठकीत कालव्यात २६ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु, जालना जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी पाणी सोडण्यास विरोध केल्याने नियोजित वेळेत पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे संताप व्यक्त करीत सेलू तालुक्यातील शेतकरी व दबावगटाने कालव्यात पाणी सोडण्याबाबत सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.अखेर शुक्रवारी दुपारी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्याचे लेखी आदेश दिल्यानंतर दुपारी दोन्ही कालव्यात पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी पाणी सोडताना अ‍ॅड.श्रीकांत वाईकर, अ‍ॅड. तुळशीराम चव्हाण, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, सतीश काकडे, विठ्ठल काळे, प्रकाश चव्हाळ, मुकूंद टेकाळे आदींची उपस्थिती होती.८ ते १० दलघमी लागेल पाणीनिम्न दुधना प्रकल्पाचा डावा कालवा ७० कि.मी. तर उजवा कालवा ४० कि.मी. आहे. दोन्ही कालव्याच्या लाभधारक शेतकºयाच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी ८ ते १० दलघमी एवढे पाणी लागणार आहे. यामुळे कालवा लाभक्षेत्रातील हजारो शेतकºयांना या पाण्याचा लाभ होणार आहे.मुंबईतील बैठकीनंतर सोडले पाणीपाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांची बैठक मुंबई येथे २६ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी पाणी सोडण्यात आले. निम्न दुधनाच्या प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आ.विजय भांबळे यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे तर आ.डॉ.राहुल पाटील यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतरच या बैठकीचे आयोजन केले होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प