शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : वीज बिलावरून आडले आठ गावचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:36 IST

वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : वीज बिल थकल्याने आठ गाव पाणीपुरवठा योजनेच्या पंपहाऊस व जलशुृद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने या योजनेतील गावे तहानलेले आहेत. दरम्यान, वीज बिलावरून या योजनेचे पाणी आडल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे.निम्न दुधना प्रकल्पातून आठ गाव पाणीपुरवठा योजनेला पाणी घेतले जाते. या योजनेचे पंपहाऊस देवला (ता. परतूर जि.जालना) येथे आहे. तर जलशुद्धीकरण केंद्र सेलू तालुक्यातील रवळगाव येथे आहे. पंपहाऊस व जलशुद्धीकरण केंद्र या दोन्ही ठिकाणचे जवळपास १२ लाख रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने पाच महिन्यापूर्वीच दोन ठिकाणची वीज तोडली.दरवर्षी टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, देऊळगाव, डासाळा, आहेरबोरगाव, गुगळी धामणगाव, तिडी पिंपळगाव, म्हाळसापूर, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी व जलस्त्रोत कोरडे पडले. परिणामी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आठ गाव पाणीपुरवठा योजनेशिवाय गावांना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने आठही गावातील ग्रामपंचायतींनी योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. अनेक गावात चार ते पाच दिवसांना उपलब्ध पाणी स्त्रोतावरून दिले जात आहे.केवळ थकित वीज बिलावर महावितरण आडूून बसल्याने दुधनात पाणी असूनही आठ गावे पाण्यासाठी व्याकूळ झाली आहेत. दुष्काळी परिस्थिती असतानाही थकित वीज बिलावरून योजनेचे पाणी सुरू करण्यासाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ंआठ गावातील ग्रामपंचायतींनी निम्मे थकित वीज बिल चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या तीन ग्रामपंचायतींनी ५० हजार तर मोठ्या ग्रामपंचायतींनी प्रत्येकी १ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. धनादेश देखील एकत्र केले आहेत. टंचाई लक्षात घेऊन प्रशानसाने थकित वीज बिलाचा दंड आकारू नये. तसेच निम्या रक्कमेवर पाणीपुरवठा योजनेची वीज पूर्ववत करावी-कैलास मोगल, सरपंच कुंडी

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीmahavitaranमहावितरण