शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विसर्जनाला उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:42 IST

दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या.गणेशोत्सवाच्या काळात १० दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची शहरात रेलचेल होती. रविवारी बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच सुरुवात केली. सायंकाळच्या सुमारास गणेश मंडळ स्थळापासून ढोल-ताशे आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मिरवणुकांना प्रारंभ झाला. चार चाकी वाहनांमध्ये आरुढ झालेली गणरायची मूर्ती आणि त्या समोर लेझीम, झांज पथक, टाळ, मृदंगाचा गजर करीत या मिरवणुका शहरातील मुख्य मार्गाने पुढे सरकत होत्या. रात्री ८ वाजेच्या सुमारास देशमुख गल्ली मित्र मंडळाचा गणपती मिरवणूक मार्गावर दाखल झाला. पारंपारिक वेषामध्ये गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यानंतर नारायणचाळ भागातून सुवर्णकार गणेश मंडळाची भव्य मिरवणूक गणेशभक्तांचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीतील ढोल पथकाने लक्ष वेधून घेतले. चांदीच्या आवरणाचा रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले. त्याच पाठोपाठ बालाजी गणेश मंडळाचा सजीव देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या मिरवणुका गांधी पार्क, शिवाजी चौक येथे दाखल झाल्यानंतर मान्यवरांनी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. शिवाजी चौकात शिवसेनेच्या मंचावर आ.डॉ.राहुल पाटील यांनी गणेश मंडळ पदाधिकाºयांचे स्वागत केले. गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक या ठिकाणी भाजपाच्या वतीने मंच उभारुन पदाधिकाºयांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी अल्पोहार आणि पाण्याची व्यवस्था केली होती. रात्री १२ वाजेपर्यंत या मिरवणुका चालल्या. त्यानंतर वसमतरोडवरील जलशुद्धीकरण केंद्रात महापालिकेने उभारलेल्या हौदामध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी विनवणी करीत भक्तांनी गणरायाला निरोप दिला.

टॅग्स :parabhaniपरभणीGanesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिस