शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रखडलेल्या रस्त्याने घेतला एकाचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:04 IST

पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे.केंद्रीय रस्ता निधीतून वेगवेगळ्या दोन टप्प्यात पूर्णा ते झिरोफाटा या २० कि.मी. अंतराच्या रस्ता रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्यावरील लक्ष्मीनगर पाटी परिसरात दोन्ही टप्प्यातील अर्ध्या कि.मी.चे काम रखडलेले आहे.या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. मंगळवारी या रखडलेल्या रस्त्याने एका वाहनचालकाचा बळी घेतला. पूर्णा येथील श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष ढोणे (६८) यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर अ‍ॅक्टीव्हा गाडी घेतली होती. या गाडीच्या पासिंगसाठी ते व त्यांची मुलगी कोमल हे दोघे पूर्णेकडून झिरोफाटामार्गे परभणीकडे जात होते.पूर्णा ते लक्ष्मीनगर पाटी दरम्यान अचानक चांगला रस्ता संपला आणि वेगात असलेली अ‍ॅक्टीव्हा रखडलेल्या रस्त्यावर गेली.त्यामुळे गाडीचा तोल सांभाळू न शकल्याने सुभाष ढोणे यांचा १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अपघात झाला. या अपघातात ढोणे हे जागेवर बेशुद्ध झाले. तर त्यांच्या मुुलीला गंभीर दुखापत झाली. त्याच वेळी परिसरातून जात असलेले पूर्णा येथील मधुकर खराटे, राम भुसारे व ग्रामस्थांनी प्रयत्न करुन त्यांना खाजगी वाहनाने पूर्णा येथील रुग्णालयात दाखल केले; परंतु, सुभाष ढोणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथील हलविण्याचा सल्ला दिल्ला. नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले असता दुपारी ३ वाजता ढोणे यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. नागरिकांनी रखडलेल्या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती; परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. वेळेत हा रस्ता दुरुस्त झाला असता तर ढोणे यांचा अपघात झाला नसता, अशी भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केली जात आहे. सुभाष ढोणे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक