शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ऊसतोडीच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:29 IST

ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. या मारहाणीत १० जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): ऊसतोडीला जाण्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महातपुरी येथे घडली. या मारहाणीत १० जण जखमी झाले आहेत.महातपुरी येथील एका ऊसतोड कामगाराने ऊसतोडीला जाण्यासाठी इसाद येथील मुकादमाकडून उचल घेतली होती. मात्र ऊसतोडीसाठी जाण्यास तो चालढकल करु लागला. त्यामुळे मुकादमाने २१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी महातपुरी येथे येऊन त्याचा शोध घेतला; परंतु, तो सापडला नाही. त्यामुळे मुकादम व ऊसतोड कामगाराच्या पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद वाढत गेला. त्यातूनच दोन गटात हाणामारी झाली. या मारहाणीत सुरेश गणेश राठोड (२४), रमेश गणेश राठोड (२६), शालूबाई गणेश राठोड (५०, तिघे रा.इसाद), शंकर पिराजी निंबाळकर (४५), प्रकाश गंगाधर पवार (१९), सोनू मारोती पवार (२५), प्रकाश संग्राम देवकते (४५, सर्व रा.महातपुरी), बळीराम अर्जून इंगळे (२१, रा.गंगाखेड) हे दहा जण जखमी झाले आहेत. या जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली देशमुख, परिचारिका तक्षशिला वाघमारे, विश्वजीत मठपती, प्रकाश राठोड यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. सुरेश राठोड, शंकर निंबाळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे. तर काही जखमींना परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस