शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

परभणी: स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच युपीएससीत यश- सृष्टी देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:13 IST

युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : युपीएससी परीक्षेची तयारी करीत असताना स्वयंअध्ययनावर भर दिल्यानेच मोठे यश मिळवू शकले, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये देशात प्रथम आलेल्या सृष्टी जयंत देशमुख यांनी येथे दिली़येथील जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी सृष्टी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला़ संस्थेच्या सचिव लक्ष्मीताई देशमुख, रविराज देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सृष्टी देशमुख म्हणाल्या, मोठे होण्यासाठी मोठे स्वप्न पाहण्याची गरज आहे़ एकदा ध्येय निश्चित झाले तर सातत्यपूर्ण परिश्रमातून त्या दिशेने जाणे शक्य आहे़ केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन करीत असताना अखेरच्या वर्षी शेवटच्या पेपरनंतर अवघ्या चौदा दिवसांनीच युपीएससीची परीक्षा होती़ दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला़ तत्पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू केली होती़ अवांतर वाचन केल़े़ कोचिंग क्लासही लावल्याने प्रयत्नांना निश्चित दिशा मिळाली़ इंटरनेटचा वापर केल्याने त्याचाही फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले़ प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळत असल्याने सामाजिक कार्य आणि महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे त्या म्हणाल्या़ तत्पूर्वी आयोजित सत्कार कार्यक्रमास संस्थेच्या सचिव लक्ष्मीताई देशमुख, रविराज देशमुख, जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, अ‍ॅड़ अशोक सोनी, सभापती सुनील देशमुख, मोनाली सरनाईक, जि़प़ सदस्य अंजली देशमुख यांच्यासह जयंत देशमुख, सुनीता देशमुख आदींची उपस्थिती होती़भोपाळमध्ये संपूर्ण शिक्षण झालेल्या सृष्टी देशमुख यांचे जिंतूर हे आजोळ आहे़ येथील रविराज देशमुख यांच्या त्या भाची असून, कृषी विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांना सृष्टी देशमुख यांचे मार्गदर्शन लाभावे, या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा