शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अनधिकृत शाळांची पथकांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:44 IST

शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी न घेता जिल्ह्यात काही शाळा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या आदेशावरुन पथकांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात किती शाळा अनधिकृतरीत्या चालविल्या जातात, हे स्पष्ट होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षणाच्या हक्क कायद्यातील तरतुदीनुसार परवानगी न घेता जिल्ह्यात काही शाळा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या आदेशावरुन पथकांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात किती शाळा अनधिकृतरीत्या चालविल्या जातात, हे स्पष्ट होणार आहे.जिल्ह्यात शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाची किंवा स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आर.टी.ई. कायद्यानुसार असलेल्या तरतुदींची पूर्तता शाळांनी करणे बंधनकारक आहे. असे असताना अनेक शाळा परवानगीविनाच चालविल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांनी या शाळांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार पथकांनी शाळांच्या तपासणीला सुरुवातही केली आहे. आतापर्यंत पाच शाळांची तपासणी केली असून, त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. ज्या ठिकाणी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली, तेथे शाळा सुरू न करता अन्य ठिकाणी शाळा चालविणे, वर्ग खोल्यांची उपलब्धता नसणे, मुलांसाठी रॅम्प नसणे, मुलींसाठी स्वच्छतागृहाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसणे, अनधिकृत वर्ग चालविणे आदी त्रूटी आढळल्या आहेत.आतापर्यंत एकूण पाच शाळांची तपासणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्यात आला आहे. अजूनही ही तपासणी केली जाणार असून, आता जि.प. प्रशासन या शाळांविरुद्ध काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे....तर होऊ शकतो १ लाख रुपयांचा दंड४शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही शाळा संबंधित शासन किंवा प्राधिकरणाच्या हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करता येत नाही़ कलम १८ (५) नुसार जर राज्य शासन अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगी प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविण्यात येत असेल अथवा शाळेची मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालविण्यात येत असेल तर त्या शाळेला अनधिकृत घोषित करुन १ लाख रुपयांपर्यंतचा दंड करण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे ताकीद देऊनही अनधिकृत शाळा सुरू ठेवल्यास प्रति दिन १० हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद असल्याचे शासन आदेशावरून स्पष्ट होते

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाzpजिल्हा परिषद