शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बँकेत चोरीचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:25 IST

पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याच्या एप्रिल महिन्यात झालेल्या घटनेतील प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना गजाआड केले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याच्या एप्रिल महिन्यात झालेल्या घटनेतील प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना गजाआड केले आहे़पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ९ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या संरक्षण भिंतीवरून चॅनल गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला होता़ आत जात असताना आरोपींनी नजरेस पडेल ते इलेक्ट्रीकल वायर कटरच्या सहाय्याने तोडले़ हे वायर तोडत असताना बँकेतील तिजोरीजवळ आरोपी आले व त्यांनी रॉडच्या मदतीने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला़ तर अन्य एक जण तिजोरी रुममधील इलेक्ट्रीक वायर तोडत असताना सेक्युरिटी आलार्म वाजला़ त्यानंतर आरोपी पळून गेले़ याबाबत व्यवस्थापक अजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात १० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हे प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रवीणे मोरे यांच्या अधिपत्याखालील स्थागुशाच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली़ त्यात त्यांना फारशी माहिती हाती आली नाही़ त्यानंतर गोपनीय माहिती काढून त्यांनी यातील आरोपींचा शोध घेतला़ त्यानंतर २५ जून रोजी शेख अखिल शेख आजीम (२२, रा़ रहेमान नगर, पाथरी), शेख खुदबोद्दीन शेख शहादुल्ला (रा़ दर्गा मोहल्ला, पाथरी) या दोघांना पाथरी येथून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत कौशल्याने विचारपूस केली असता, त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारासोबत मिळून सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली़ त्यानुसार पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत़ ही कारवाई सपोनि शिवाजी देवकते, पोहेकॉ सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, पोलीस नाईक जमीर फारुखी, किशोर चव्हाण, अरुण कांबळे, गणेश कौटकर, राजेश आगासे यांच्या पथकाने केली़ दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकtheftचोरीPoliceपोलिस