शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

परभणी : मोटारसायकल चोरणारे दोन आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:13 IST

मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या पथकाकडून एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मोटारसायकलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २९ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतले आहे़ या पथकाकडून एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता़ जिंतूर येथील विज्ञान चांदोजी मुळे यांची एमएच २२ ई/६८१४ या क्रमांकाची दुचाकी २६ सप्टेंबर रोजी चोरीला गेला होती़ दरम्यान परभणीतील चोरी, घरफोड्या प्रकरणांमधील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने एक पथक स्थापन केले होते़ २९ आॅक्टोबर रोजी या पथकाने दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले़ शेख मतीन शेख रशिद (१९, रा़ झमझम कॉलनी, जिंतूर) आणि शेख इम्रान शेख इस्माईल (२२, रा़ दादा शरिफ चौक, जिंतूर) अशी या व्यक्तींची नावे आहेत़दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा जिंतूर शहरातील प्रिया बारसमोरून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली़ त्यांच्याकडून ही मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे़दोन्ही आरोपींना जिंतूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, श्याम काळे, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, शेख ताजोद्दीन यांनी केली़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसtheftचोरीArrestअटक