शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘सीएए’च्या समर्थनार्थ तिरंगा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:46 IST

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली़ या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली़ या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला़केंद्र शासनाच्या सीएए व एनआरसी या दोन कायद्यांच्या समर्थनासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समितीच्या वतीने सोमवारी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते़ येथील शनिवार बाजारात दुपारी १२ वाजेच्या सुमारास समर्थक नागरिक एकत्र आले़ यावेळी उपस्थित नागरिकांना नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला समर्थन का आहे, याची माहिती देण्यात आली़ त्यानंतर भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने ही रॅली काढण्यात आली़ ५०० फुट लांबीचा तिरंगा ध्वज घेवून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली़ अग्रभागी महिला त्यानंतर पुरुष आणि त्यापाठोपाठ तिरंगा ध्वज घेवून नागरिक रॅलीत सहभागी झाले होते़ रॅली दरम्यान, वंदे मातरम्, भारत माता की जय, मोदी मोदी, हर हर महादेव, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या़ शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दाखल झाली़ या रॅलीमध्ये कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला़ राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला़ रॅलीत आ़ मेघना बोर्डीकर, माजी आ़ मोहन फड, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, अनंत पांडे, अजित बनसोडे, सादेक इनामदार, गणेश रोकडे, अशोक डहाळे, राजकुमार भामरे, प्रल्हाद कानडे, बाळासाहेब भालेराव, रितेश जैन, जि़प़ सदस्य सुभाष कदम, दिनेश नरवाडकर, शिवप्रसाद कोरे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठ्या सहभाग होता़शहरात तगडा पोलीस बंदोबस्त४तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली़ शनिवार बाजार येथून निघालेल्या तिरंगा रॅलीसमोर पोलिसांची दोन वाहने होती़ तसेच संपूर्ण रॅली मार्गावर जागोजागी पोलीस बंदोबस्त लावला होता़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातही सर्व मार्र्गांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ विशेष म्हणजे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा या स्वत: रॅलीचा समारोप होईपर्यंत या ठिकाणी तळ ठोकून होत्या़ तसेच रॅलीचा समारोप झाल्यानंतरही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पथसंचलन केले़५०० फुटांचा तिरंगा४सीएए कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत नागरिकांनी डोक्यावर घेतलेला ५०० फुट लांबीचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरले होते़ संपूर्ण रस्ता व्यापून हा तिरंगा ध्वज रॅली मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आणण्यात आला़ यावेळी रॅलीतील नागरिकांनी वुई सपोर्ट सीएए, सीएए कायद्याला समर्थन आदी फलक हातात घेतले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलन