शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:18 IST

सलग दुसºया दिवशीही चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला असून, तालुक्यातील सावळी येथे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जून रोजी रात्री १ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली़ चोरीच्या घटना वाढल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): सलग दुसºया दिवशीही चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला असून, तालुक्यातील सावळी येथे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जून रोजी रात्री १ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली़ चोरीच्या घटना वाढल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़तालुक्यातील सावळी येथील रहिवासी रंगनाथ किशनराव रणेर हे रात्री १ वाजता कुटूंबासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते़ या संधीचा फायदा घेत घराच्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ १० तोळे सोन्याचे दागिने, पँट खिशातील रोख २६ हजार रुपये आणि ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १३ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली़ चोरी झाल्याचे लक्षात येताच रणेर कुटूंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला़ पोलीस उपनिरीक्षक शिवाशंकर मन्नाळे हे तपास करीत आहेत़ दरम्यान, १२ जून रोजी चोरट्यांनी शहरातील ९ दुकानांना टार्गेट करून चोरी केली होती.या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवून ३ लाखांची धाडसी चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे़ सतत होणाºया चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान४मानवत शहरामध्ये ११ जून रोजी चोरट्यांनी ९ दुकाने फोडली होती़ चोरट्यांच्या हाती यातून काहीही लागले नसले तरी शहरातील नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत़ त्यामुळे मानवत पोलीस तातडीने पावले उचलत चोरट्यांचा शोध घेतील, अशी अपेक्षा शहरवासियांना होती़ मात्र १२ जून रोजीच्या मध्यरात्री मानवत तालुक्यातील सावळी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून जवळपास ३ लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा शहराऐवजी आता ग्रामीण भागाकडे वळविल्याचे १२ रोजीच्या घटनेवरून समोर येत आहे़ त्यामुळे मानवत पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीtheftचोरीPoliceपोलिस