शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ऊसतोडीच्या पैशावरून तीन जणांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:42 IST

ऊसतोडीच्या कामासाठी उचल म्हणून घेतलेले पैसे परत मागण्यासाठी आलेल्या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने आॅटोत टाकून पळवून नेत हवाला मिळाल्यानंतर सोडून दिल्याची घटना गंगाखेड येथे २३ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): ऊसतोडीच्या कामासाठी उचल म्हणून घेतलेले पैसे परत मागण्यासाठी आलेल्या दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने आॅटोत टाकून पळवून नेत हवाला मिळाल्यानंतर सोडून दिल्याची घटना गंगाखेड येथे २३ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली.गंगाखेड तालुक्यातील पिंपरी येथील सुभाष सोपान कांबळे यांनी ६ महिन्यांपूर्वी इसाद येथील सगुणाबाई इसादकर यांच्याकडून ऊसतोडीच्या कामासाठी ६५ हजार रुपयांची उचल घेतली होती. कामाला जायचे नाही म्हणून महानंदा सुभाष कांबळे यांनी यातील २० हजार रुपये सगुणाबाई इसादकर यांना परत दिले. सुभाष कांबळे यांचे कुुटुंंब दुसरीकडे कामाला निघून गेले. उचल घेतलेले हे पैसे परत मागण्यासाठी २२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सगुणाबाई इसादकर यांनी सुभाष कांबळे यांचे भाऊ मुंजाजी कांबळे यांच्याघरासमोर बसत माझ्याकडून ऊसतोड कामाच्या उचलीचे पैसे परत मागितले. दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी आलेल्या मुंजाजी सोपान कांबळे यांनी मी किंवा माझ्या आईने तुमच्याकडून पैसे घेतले नाहीत. तरीही येणाऱ्या १० तारखेपर्यंत माझ्या भावांनी घेतलेले तुमचे पैसे परत देऊ असे सांगितले; परंतु, इसादकर यांनी पिंपरी येथील अजय भिसे यांना बोलावून सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंजाजी कांबळे यांना थापड बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यासह आईला आॅटोत बसवून गंगाखेड येथील दत्तमंदिर परिसरात आणले.आॅटोमध्ये मारहाण करीत पैसे दिले नाहीत तर जिवंत ठेवणार नाहीत, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रकाश प्रभू भिसे यांनी पैशाचा हवाला घेत फिर्यादी मुंजाजी कांबळे व त्याच्या आईला सोडविले असल्याची फिर्याद शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंजाजी कांबळे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरुन २३ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास सगुणाबाई इसादकर (रा.इसाद), अजय भिसे (रा.पिंपरी) यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले, सहायक पोलीस निरीक्षक राजेश राठोड हे करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी