शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : आणखी तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:46 IST

शहरातील रमाबाईनगरात एका युवकाचा तलवारीचे वार करुन खून केल्या प्रकरणात पोलिसांनी १८ आॅक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना परभणीतून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील रमाबाईनगरात एका युवकाचा तलवारीचे वार करुन खून केल्या प्रकरणात पोलिसांनी १८ आॅक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना परभणीतून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.परभणी शहरातील रमाबाईनगरात बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरुन शेख सोहेल शेख आहत, शेख सोहेल याचा मित्र शेख मोहसीन व शेख लुकमान या तिघांवर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये शेख सोहेल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचे मित्र शेख मोहसीन व शेख लुकमान हे जखमी झाले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शेख मोहसीन याने फिर्याद दिली होती. त्यानंतर शेख हाजी शेख सलीम, शेख मोहम्मद शेख अहेमद, शेख समी शेख सलीम, शेख शोएब शेख तैमूर, शेख तैमूर शेख जिलानी व शेख सद्दाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी शेख हाजी शेख सलीम, शेख मोहम्मद शेख अहेमद या दोघांना अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेख समी, शेख शोएब, शेख तैमूर या तिघांना परभणी येथून अटक केली. त्यानंतर त्यांना कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणातील शेख सद्दाम हा एक आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि.सुनील गिरी करीत आहेत.पोलिसांचे दुर्लक्ष चर्चेचा विषय४या प्रकरणात मयत युवक शेख सोहेल व शेख शोएब शेख तैमूर यांच्यात गल्लीत मोटारसायकल वेगाने चालविण्याच्या कारणावरुन १६ आॅक्टोबर रोजी वाद झाला होता. त्यानंतर शेख सोहेल याने कोतवाली पोलीस ठाण्यात जावून या प्रकरणी तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जावर कोतवाली पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. शिवाय या वादाचे गांभीर्यही लक्षात घेतले नाही. या तक्रार अर्जाची आरोपींना कुणकुण लागली. त्यातूनच मयतावर दुसऱ्या दिवशी तलवारीने हल्ला करण्यात आला असल्याचे समजते.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीMurderखून