शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दोन हायवा ट्रकसह तीन जेसीबी मशीन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:47 IST

तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : तालुक्यातील गौंडगाव व मैराळ सावंगी येथील वाळू धक्क्यावरून नियमबाह्य वाळू उपसा सुरू असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई करीत दोन हायवा ट्रक आणि तीन जेसीबी मशीन जप्त केल्या आहेत़ शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़गौंडगाव, मैराळ सावंगी नदीपात्रातून जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाळुचा उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे आल्या होत्या़ या तक्रारीवरून २६ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांच्या पथकाने गौंडगाव येथील वाळू धक्क्यावर धाड टाकली़ पथक दाखल होत असल्याचे पाहताच वाळू माफियांनी धक्क्यावरील वाहने पळवून नेण्यास सुरुवात केली़ यावेळी एमएच ४४/९१३१ आणि एमएच २४/एबी ७७६६ हे दोन हायवा ट्रक पाठलाग करून पकडण्यात आले़ याच वेळी वाळू धक्क्यावर असलेल्या तीन पोकलॅन मशीन धक्क्यावरून पळवून नेत गौंडगाव-मैराळ सावंगी रस्त्यापासून दोन किमी आत दिगंबर कºहाळे यांच्या शेतात लपवून ठेवल्या होत्या. जिल्हाधिकाºयांच्या पथकाने या जेसीबी मशीन शोधून ताब्यात घेतल्या आहेत़तलाठ्यांचा शेतात मुक्कामजिल्हाधिकाºयांनी कारवाई केल्यानंतर वाळूमाफियांनी जेसीबी मशीन शेतात लपवून ठेवल्या होत्या़ या मशीन शोधून पथकाने जप्त केल्या़ परंतु, मशीन सुरू करण्याचे यंत्रच काढून नेण्यात आले आहे़ त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत या मशीन सुरू झाल्या नाहीत़परिणामी गंगाखेड येथील तलाठी चंदक्रांत साळवे, अक्षय नेमाडे, मुलंगे, वाकळे, अव्वल कारकून रामराव जाधव, एरंडवाड, जमादार देवराव मुंडे, रामराव तांदळे यांना शेतात बोलावून मशीन त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या़ परंतु, रात्रभर या मशीन सुरू न झाल्याने तलाठी व महसूलच्या कर्मचाºयांना शेतातच मुक्कामी रहावे लागले़रविवारी सायंकाळी ६़३० वाजेपर्यंत जप्त केलेल्या मशीन सोनपेठ पोलीस ठाण्यात नेण्याची व्यवस्था झाली नसल्याने कर्मचारी शेतातच बस्तान मांडून आहेत़माहिती देण्यास वेळ नाहीगौंडगाव येथे गोदावरी नदीपात्रातील वाळू धक्क्यावर कारवाई करण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी अनेक वेळा वाहने बदलली. या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांना फोन केला़ मात्र त्यांनी नंतर माहिती देते, असे सांगून माहिती देण्यास टाळले़ गंगाखेड तहसील कार्यालयातील कर्मचारी, तलाठी यांना वारंवार संपर्क साधूनही ‘माहिती उपलब्ध नाही’, असे उत्तर कर्मचाºयांकडून दिले जात होते़

टॅग्स :parabhaniपरभणीcollectorतहसीलदारsandवाळू