शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पूर्णा येथे रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:45 IST

तांत्रिक दुरुस्तीसाठी पीटलाईनवरुन जाताना रिकाम्या पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या पूर्णा रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): तांत्रिक दुरुस्तीसाठी पीटलाईनवरुन जाताना रिकाम्या पॅसेंजर रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची घटना ११ एप्रिल रोजी दुपारी दीडच्या पूर्णा रेल्वेस्थानकाच्या यार्डात घडली.पूर्णा- परळी ही पॅसेंजर रेल्वे दररोज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पूर्णा रेल्वेस्थानकावरुन सुटते. या रेल्वेगाडीची स्वच्छता आणि किरकोळ दुरुस्तीचे काम स्थानकावरील यार्डात केले जाते.गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गाडीची स्वच्छता करुन तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी ही रेल्वे पीट लाईनवरुन जात असताना रुळावरील एका सांध्यावरुन शंटिंग करताना १०२ ब क्रमांकाच्या ईएचएल पॉर्इंटवर ९६४०६, ९९४५५ आणि ०७४२५ या क्रमांकाचे तीन डबे रुळावरुन खाली घसरले. ही गाडी रिकामी असल्याने कोणतीही जीवीत हानी अथवा नुकसान झाले नाही. घटना घडताच दुर्घटना निवारण पथक (एआरटी) घटनास्थळी दाखल झाले. खाली घसरलेले तीनही डबे पूर्ववत रुळावर आणण्यासाठी या पथकाला ५ तास परिश्रम घ्यावे लागले. नांदेड विभागातील वरिष्ठ अधिकारीही पूर्णा येथे दाखल झाले असून सायंकाळी ७ वाजता डबे रुळावर घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या घटनेमुळे मुख्य मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झाला नसला तरी पूर्णा- परळी आणि पूर्णा- आदिलाबाद या दोन रेल्वेगाड्या दोन ते तीन तास विलंबाने धावल्या.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वे