शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : फरार तिघे पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:08 IST

जबरी चोरी तसेच वाळू चोरीचे गुन्हे दाखल असताना सुद्धा ८ वर्षापासून न्यायालयात अनुपस्थित राहून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात अखेर गंगाखेड पोलिसांना यश आले असून या तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): जबरी चोरी तसेच वाळू चोरीचे गुन्हे दाखल असताना सुद्धा ८ वर्षापासून न्यायालयात अनुपस्थित राहून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यात अखेर गंगाखेड पोलिसांना यश आले असून या तिघांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२००८ व २०१० साली जबर चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी गजानन प्रभाकर कचरे (रा.जैनगल्ली अंबाजोगाई) हा न्यायालयाने वारंवार समन्स तसेच अटक वॉरंट काढून सुद्धा न्यायालयात हजर राहत नव्हता व पोलिसांनाही मिळून येत नव्हता. याच बरोबर २०१० साली वाळू चोरीसह महाराष्ट्र गौण खनीज अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वनाथ रघुनाथ दहिफळे व वैजनाथ रघुनाथ दहिफळे (रा.हाळंब ता.परळी) हे दोघे भाऊही न्यायालयात हजर राहत नसल्याने गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोईनोद्दीन पठाण, अन्ना मानेबोईवाड, शेख मुजीब, सुग्रीव कांदे, शेख जिलानी, रवि कटारे आदी पोलीस कर्मचाºयांनी ११ नोव्हेंबर रोजीच्या रात्री सापळा लावून तिघाही आरोपींना ताब्यात घेऊन जेरबंद केले. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात अनुपस्थित राहिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस