शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : बोरी येथील टोळीस पोलिसांनी केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:17 IST

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सर्वसामान्यांच्या जिवितास धोका निर्माण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे आदी कारवाया करुन गुन्हे घडवून आणणाऱ्या तिघांना जणांच्या बोरी येथील टोळीस पोलिसांनी हद्दपार केले आहे.बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओंकार दत्तराव चौधरी, विलास जालिंदर चौधरी, जयदीप प्रकाश देशमुख आणि पवन विलास चौधरी यांच्याविरुद्ध २०१५ पासून ते २०१८ पर्यंत बोरी पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल असून टोळीप्रमुख ओंकार चौधरी याच्याविरुद्ध ६ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये ओंकार चौधरी यास तीन महिन्यांसाठी जिंतूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतरही तीन दखलपात्र गुन्हे घडवून आणले. २०१८ मध्ये ग्रामस्थ, व्यापारी व महिलांनी या टोळीपासून दहशतमुक्त करावे, असा लेखी अर्जही पोलिसांना दिला होता. त्यावरुन हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला.या प्रकरणात २५ मे रोजी सुनावणी होऊन टोळी प्रमुख ओंकार चौधरी यास १८ महिन्यांसाठी तर विलास चौधरी, जयदीप देशमुख यांना प्रत्येकी १२ महिन्यांसाठी जिंतूर, परभणी, सेलू, मानवत, पाथरी तसेच हिंगोली जिल्ह्यातील औंढा, सेनगाव, वसमत या तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत. या आदेशाप्रमाणे हद्दपार व्यक्तींना बोरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार व पोलीस नाईक सुनील गिरी यांनी ताडकळस येथे नेऊन सोडले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस