शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पाठलाग करून चोरास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 23:39 IST

येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला नांदेड जवळील विष्णुपुरी परिसरात पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला नांदेड जवळील विष्णुपुरी परिसरात पकडले.पालम नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे हे १५ आॅगस्ट सकाळी ७ वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते. दररोज वापरातील चारचाकी गाडी घरी सोडून ते शहरात दुचाकीने भेटी गाठी घेत होते. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून एका चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याच्या अंगठ्या व नगदी दोन लाख १५ हजार रुपये आणि घरासमोरील महिंद्रा एक्स.यु.व्ही. एम.एच २२ /ए.टी. ७७७६ क्रमांकाची गाडी घेऊन सदरील चोरटा नांदेडकडे निघून गेला. दरम्यान, उपनगराध्यक्ष रोकडे हे घरी आले असताना घराचा दरवाजा उघडा दिसला व समोर गाडीही नव्हती. त्यामुळे त्यांनी लोहा, नांदेड ,अहमदपूर, परभणी, गंगाखेड येथील मित्रांना फोन करून गाडी चोरी झाल्याची माहिती दिली.नागरिकांनी तातडीने नांदेड मार्गे गाडी जात असल्याचे त्यांना फोनवर कळविले. त्यानंतर नागरिकांनी नांदेड जवळील विष्णुपुरी परिसरात ही गाडी अडविली. त्यावेळी आरोपीने चाकूचा धाक दाखवून गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी मोठा जमाव जमून चोरास पकडले. त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क करून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत बालासाहेब रोकडे यांच्या फियार्दीवरून आरोपी ज्ञानेश्वर बालाजी जाधव (रा. आष्टूर, ता. लोहा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीjewelleryदागिने