लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात १२ दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून ४० अंशापेक्षा अधिक तापमान राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईतही भर पडल्याचे दिसत आहे.यावर्षी मार्च महिन्यापासूनच उन्हाचा पारा वाढला आहे. २५ मार्च रोजी यावर्षातील तापमान ४० अंशापर्यंत नोंद झाले. त्यानंतर ५ एप्रिलचा अपवाद वगळता सलग १२ दिवस पारा ४० अंशापेक्षा अधिक राहिल्याने नागरिकांना कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. वाढत्या तापमानामुळे वातावरणात उकाडाही वाढत असून नागरिक त्रस्त आहेत. दिवसभर शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. तापमान वाढीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याने टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.तापमानवाढीची शक्यता४वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने १० एप्रिलपर्यंतचा तापमानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात हे तापमान ४३ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तविली आहे. ७ एप्रिल रोजी ४२ अंश आणि ८ ते १० एप्रिलपर्यंत ४३ अंश तापमान राहील, असा अंदाज आहे.
परभणी: चाळीस दिवसांपासून पारा चढलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 23:01 IST