शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

परभणी : करदाते वाढले अन् उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:22 IST

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत करदात्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रत्यक्षात शासनाला मिळणाºया करात मात्र घट झाली आहे़ याशिवाय १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाºया व्यापाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे़

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत करदात्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली असली तरी प्रत्यक्षात शासनाला मिळणाºया करात मात्र घट झाली आहे़ याशिवाय १ कोटीपेक्षा जास्त कर भरणाºया व्यापाऱ्यांच्या संख्येतही कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे़जिल्ह्यातून गोळा करण्यात आलेल्या मूल्यवर्धित करातील महसूलाचा २०१७-१८ या वर्षाचा अहवाल काही महिन्यांपूर्वी राज्याच्या विक्रीकर विभागाने शासनाला सादर केला होता़ त्यानंतर तो अहवाल जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालांतर्गत प्रसिद्ध करण्यात आला आहे़ या अहवालानुसार २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांत कर भरणाºया व्यापाºयांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली; परंतु, कराच्या रकमेत मात्र कपात झाल्याचे दिसून येत आहे़ २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात ३ हजार ७२१ व्यापाºयांनी मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) माध्यमातून ५९ कोटी ८ लाख २७ हजार रुपयांचा महसूल शासनाकडे जमा केला होता़ २०१४-१५ मध्ये कर भरणाºया व्यापाºयांची संख्या ४ हजार १८ झाली; परंतु, महसूल मात्र ६१ कोटी ६३ लाख रुपयांवर आला़ २०१५-१६ या वर्षात जिल्ह्यातील ३ हजार ५७ व्यापाºयांनी ४५ कोटी ७ लाख ८७ हजार रुपयांचा कर भरला़ २०१६-१७ मध्ये करदात्या व्यापाºयांची संख्या वाढून ४ हजार २९६ झाली़ या व्यापाºयांनी ५१ कोटी २३ लाख रुपयांचा कर भरणा केला़ २०१७-१८ या वर्षांत मात्र ५ हजार १३० व्यापाºयांनी ४५ कोटी ७३ लाख ८० हजार रुपयांचा व्हॅट भरला़ त्यामुळे ५ वर्षांत व्यापाºयांच्या संख्येत १ हजार ४०९ ने वाढ झाली असली तरी उत्पन्नात मात्र तब्बल २३ कोटी ३५ लाख रुपयांनी घट झाली आहे़ विशेष म्हणजे २०१७ मध्ये देशभरात व्हॅट बंद होऊन जीएसटीचा कर लागू झाला़ तरीही कर भरणाºया व्यापाºयांच्या संख्येत फारशी वाढ झाली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे़ जिल्ह्यात १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर भरणारे २०१२-१३ मध्ये ९ व्यापारी होते़ २०१३-१४ मध्ये ही संख्या ८ वर आली़ २०१४-१५ मध्येही असे आठच व्यापारी होते़ २०१५-१६ मध्ये ही संख्या ६ वर आली़ त्यानंतर २०१६-१७ मध्ये ५ तर २०१७-१८ मध्ये १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर भरणारे जिल्ह्यात चारच व्यापारी राहिले आहेत़ त्यामुळे गेल्या सहा वर्षांत १ कोटी पेक्षा अधिक कर भरणारे ५ व्यापारी घटल्याचे दिसून येत आहे़ परिणामी जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीत गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्याने घटच झाल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे़नोंदणीनंतरही कर भरण्यास खोविक्रीकर विभागाकडे प्रत्येक व्यापाºयाने आपली नोंद करणे आवश्यक आहे़ त्यानुसार २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील ७४२ व्यापाºयांनी नोंदणी करूनही कराचा भरणा केला नाही़ तर २०१४-१५ मध्ये ७६९ आणि २०१५-१६ मध्ये १ हजार ८३ व्यापाºयांनी नोंदणी करूनही कर भरला नाही़ २०१६-१७ या वर्षात तब्बल २ हजार ३२३ व्यापाºयांनी तर २०१७-१८ या वर्षांत २ हजार १०५ व्यापाºयांनी शासनाकडे कसलाही कर भरला नाही़१ कोटीपर्यंत कर भरणाºया व्यापाºयांचीही संख्या घटलेलीचजिल्ह्यात २०१३-१४ ते २०१७-१८ या पाच वर्षांत १० लाख ते १ कोटीपर्यंत व्हॅट भरणाºया व्यापाºयांच्या संख्येतही सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे़ २०१३-१४ मध्ये ७४ व्यापाºयांनी १० लाख ते १ कोटीपर्यंत कर भरला होता़ २०१४-१५ मध्येही ७४ व्यापाºयांनीच कर भरला होता़ २०१५-१६ मध्ये यात घट होऊन व्यापाºयांची संख्या ६५ वर आली़ २०१६-१७ मध्ये मात्र या व्यापाºयांच्या संख्येत ४ ने वाढ होऊन ती ६९ झाली़ २०१७-१८ मध्ये मात्र जीएसटी अंमलबजावणीनंतरही १० लाख ते १ कोटीरपर्यंत कर भरणाºया व्यापाºयांची संख्या ५८ वर आली आहे़१० लाखांपेक्षा कमी भरणाºया व्यापाºयांत किंचित वाढजिल्ह्यात विक्रीकर विभागाकडे १० लाखांपेक्षा कमी कर भरणाºया व्यापाºयांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे़ २०१३-१४ मध्ये २ हजार ८९७ व्यापाºयांनी १० लाखापेक्षा कमी कर भरला होता़ २०१४-१५ मध्ये ही संख्या ३ हजार १६७ झाली़ तर २०१५-१६ मध्ये त्यामध्ये कमालीची घट होऊन ती १ हजार ९०३ पर्यंत आली़ २०१६-१७ मध्येही १ हजार ८९९ व्यापाºयांनीच १० लाखांपेक्षा कमी कर भरला़ २०१७-१८ मध्ये मात्र २०१३-१४ च्या तुलनेत अधिक म्हणजेच २ हजार ९६३ व्यापाºयांनी १० लाखांपेक्षा कमी कर भरल्याची नोंद आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीTaxकरGovernmentसरकार