शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

परभणी : सेलू परिसरात दमदार पाऊस; पिकांना मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:48 AM

सेलूू शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर तब्बल एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे या भागातील ओढे व नाले दुथडी भरुन वाहिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : सेलूू शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर तब्बल एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे या भागातील ओढे व नाले दुथडी भरुन वाहिले.सेलू शहर व परिसरात मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास १ तास दमदार पाऊस झाला. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरुच होती. तालुक्यातील कुपटा, वालूर, चिकलठाणा भागातही दमदार पाऊस झाला. सेलू व देऊळगाव महसूल मंडळात साधारण पाऊस झाला. कुपटा परिसरात दमदार पाऊस झाल्याने परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यात बºयापैकी पाणी साचले. या पावसाच्या पाण्यामुळे कुपटा ते कुपटा फाटा जोडणाºया रस्त्यावरील अरुंद पुलावरुन काही वेळ पाणी वाहत होते. यामुळे कुपटा गावाची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. येथील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. मोरेगाव ते वालूर रस्त्यावरील हतनूर गावाजवळून वाहणारा ओढाही यंदा प्रथमच दुथडी भरुन वाहत होता. विशेष म्हणजे वालूर- कुपटा आणि चिकलाठाणा परिसरात पहिल्यांदाच दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, परभणी शहर व परिसरातही गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्त्यावर सकाळच्या वेळी बºयापैकी पाणी साचले होते. यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला. असे असले तरी हा पाऊस सर्वदूर झाला नाही. परिणामी परभणी तालुक्यातील अनेक भागांमध्येही पावसाने हजेरी लावली नाही. परभणी तालुक्यात ६.५० मि.मी. पाऊस झाल्याची शुक्रवारी सकाळी महसूल विभागाकडे नोंद झाली.जिल्हाभरात यंदा पावसाचे प्रमाण कमीच४जिल्हाभरात आतापर्यंत एकही मोठा पाऊस झालेला नाही. असे असले तरी जिल्ह्यात सरासरी १२५.१२ मि.मी. पाऊस आतापर्यंत झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे.४त्यामध्ये परभणी तालुक्यात ११३.६३ मि.मी., पालम तालुक्यात ९७.९९ मि.मी., पूर्णा तालुक्यात १३०.६० मि.मी., गंगाखेड तालुक्यात १३४.५० मि.मी., सोनपेठ तालुक्यात १४०.५० मि.मी., सेलू तालुक्यात ९९.४० मि.मी. पाथरी तालुक्यात ११४ मि.मी. जिंतूर तालुक्यात १३२.१६ मि.मी. आणि मानवत तालुक्यात १६३.३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊस