शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:50 IST

मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले़स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी उसाच्या दरासाठी राज्यभरात आंदोलन पुकारले असून, या अंतर्गत परभणी येथे रविवारी आंदोलन करण्यात आले़ सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास त्रिधारा पाटी येथे शेतकरी जमा झाले होते़२०१८-१९ मधील उसाचा पहिला हप्ता आणि २०१७-१८ मध्ये गाळप झालेल्या उसाच्या अंतीम बिलाबाबत हे आंदोलन करण्यात आले़ जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत २०१७-१८ या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या दराबाबत साखर कारखाना व शेतकरी नेते यांच्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने समझोता झाला होता़ त्यावेळी एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊस उत्पादकांना अदा करावी असे ठरले होते़ मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम मिळाली नाही़ २०१८-१९ चा गळीत हंगामास पुरविल्या जाणाºया उसालाही एफआरपी अधिक २०० रुपये साखर कारखान्याने द्यावेत, साखर कारखान्यांना पैशांची उपलब्धता व्हावी, यासाठी साखरेचे दर वाढवू तसेच बँकेतून कर्ज उपलब्ध करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती़ याच धरतीवर मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी दर घोषित करून मागील वर्षीची थकबाकी द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले़रस्ता रोको आंदोलनामुळे अर्धा ते पाऊण तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, अमोल जवंजाळ, गंगाधर जवंजाळ, रामभाऊ आवरगंड, केशव आरमळ, शेख जाफर, मुंजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, बाळू पोते, गोविंद खटींग, सुधाकर खटींग, अजय खटींग, छत्रगुण खटींग, नामदेव खटींग आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीagitationआंदोलन