शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पडेगाव, रत्नापूर येथे बसवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:17 IST

तालुक्यातील पडेगाव पाटीजवळ जिंतूर आगाराच्या लातूर-जिंतूर (बस क्रमांक एमएच १४ बीटी-२१९२) या बसवर दगडफेक केल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री १०़१५ च्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील पडेगाव पाटीजवळ जिंतूर आगाराच्या लातूर-जिंतूर (बस क्रमांक एमएच १४ बीटी-२१९२) या बसवर दगडफेक केल्याची घटना २१ जुलै रोजी रात्री १०़१५ च्या सुमारास घडली़घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील प्रवासी परळी नाका येथे उतरून बस पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहे़ यामध्ये बसचे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़ या प्रकरणी चालक किशन मानकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौघांविरूद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पोलीस शिपाई संदीप पांचाळ तपास करीत आहेत़रत्नापूर येथे बसवर दगडफेकतालुक्यातील रत्नापूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित टोल नाक्याजवळ रविवारी सकाळी ११़२० च्या सुमारास पाथरी आगाराच्या परभणी-पाथरी या बसवर चार अज्ञातांनी दगडफेक केली़ यामध्ये बसचे समोरील व पाठीमागील काच गजाने फोडण्यात आले. तर दोन्ही बाजूंच्या खिडक्यांवर दगडफेक करून आठ खिडक्या फोडल्या़ यामध्ये एसटीचे ५० हजारांचे नुकसान झाले़ या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे़परभणी जिल्ह्यात गुरुवारपासून महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्याच्या घटना होत आहेत़ परभणी, गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठ इ. भागांत या घटना घडल्या़ आतापर्यंत जिल्ह्यात १६ बसवर दगडफेक केल्याने बसचे नुकसान झाले आहे़ महामंडळ प्रशासनाने या संदर्भात ठिक ठिकाणी अज्ञातांविरूद्ध गुन्हे नोंदविले आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीstate transportराज्य परीवहन महामंडळPoliceपोलिस