शहरातील परसावत नगर भागातील सचिन गायकवाड यांना त्यांचे भाऊजी अंबादास मधुकर दुधाटे हे दारू पिऊन ६ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० च्या सुमारास त्यांच्या बहिणीस मारहाण करीत असल्याचे समजले. त्यानंतर ते बहिणीच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचे भाऊजी अंबादास दुधाटे हे सचिन यांची बहीण नीलिमा यांना मारहाण करीत होते. यावेळी गायकवाड यांनी दुधाटे यांना बहिणीस मारहाण करू नका, असे म्हणताच अंबादस यांना त्यांनी शिवीगाळ केली. तसेच घरातून चाकू आणून सचिन गायकवाड यांच्या पाठीवर तीन वार केले. यात सचिन यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी नातेवाईक व इतरांनी येऊन सोडवासोडव केली. याबाबत सचिन गायकवाड यांनी १६ ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून आरोपी अंबादास मधुकर दुधाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणीत मेहुण्यावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST