शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : रेल्वे फाटकावर एसटी बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:35 IST

शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : शहरातील पालम रेल्वे फाटकावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या बेशिस्त वाहनांमुळे धारूर-नांदेड बसला अपघात झाल्याची घटना २५ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर आगाराची नांंदेडकडे जाणारी बस (क्रमांक एम.एच.२०-बी.एल.०१३२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास गंगाखेड बसस्थानकातून पालम, लोहा व नांदेड येथे जाणारे ५८ प्र्रवासी घेऊन निघाली असता बसस्थनकाजवळ असलेला पालम नाका रेल्वेफाटक आदिलाबाद-परळी या रेल्वेची वेळ झाल्याने फाटक बंद होते. त्यामुळे बस फाटक परिसरात थांबली होती. यावेळी फाटकाच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या दुतर्फा लागलेल्या वाहनांच्या रांगातून बस बाहेर काढताना मधेच येत असलेल्या दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस रेल्वेफाटकाच्या बाजूला असलेल्या लोखंडी कठड्यांकडे वाहकाच्या बाजूने झुकली. वेळीच सावध चालकाने लोखंडी कठडे तोडून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात बस पलटी होऊ नये याची दक्षता घेत बस पुढे नेली. वाहकाच्या बाजूने बस घासत शेवटपर्यंत गेली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धांदल उडाली. प्रसंगावधान राखत बसचालक शेख नजीर व वाहक रुख्मिणी केकान यांनी बस तेथून बाहेर काढून नांदेड रोडवरील दत्त मंदिर परिसरात रस्त्याच्या बाजूला बस थांबवून बसची पाहणी केली. यामध्ये बसचे नुकसान होऊन बस खिळखीळी झाल्याने नांदेडकडे जाणाऱ्या दुसºया बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रवाना केले. अचानक घडलेल्या घटनेमुळे बसमधून प्रवास करणाºया पासधारक व ५५ प्रवाशांबरोबरच स्टाफचे तीन प्रवासी तसेच चालक, वाहक यांचा जीव भांड्यात पडला.बस अपघातातून सुखरूप बाहेर पडल्याचे पाहून सर्वांच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.दुतर्फा बेशिस्त लागलेल्या वाहनांमुळे अपघातपालम नाक्यावर असलेल्या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहने वळण रस्त्याने पालम रस्त्यावर काढण्यात आली आहेत. यातच येथील रस्ता पूर्णत: खड्डेयुक्त झाल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रेल्वेच्या वेळापत्रकानुसार दिवसातून २५ ते ३० वेळा फाटक बंद होत आहे. यातच पुढे जाण्याची घाई करीत दुचाकीचालक, आॅटोचालक व छोटे वाहनधारक आपली वाहने बेशिस्तपणे रस्त्यावर दुतर्फा लावली जात असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात