शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : सोयाबीनची गंजी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 00:21 IST

जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील निवळी बु. येथील एका शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.निवळी बु. येथील शेतकरी राजेभाऊ मुंजाजी खिस्ते यांनी आपल्या गट नंबर १८४, १८८ मधील चार एकरमध्ये असलेले सोयाबीन कापून त्याची गंजी लावली होती. २१ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अचानक बाजूला असलेल्या महावितरणची विद्युत तार खाली पडली. या दरम्यान झालेल्या शॉर्टसर्किटमुळे जवळच असलेल्या गंजीने पेट घेतला. यामध्ये संपूर्ण गंजी जळून खाक झाली. यामध्ये शेतकºयाचे दीड लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस. खोले यांनी भेट दिली. या घटनेचा पंचनामा तलाठी बालाजी नागदे यांनी केला. दरम्यान, झालेल्या नुकसानीची मदत देण्यात यावी, अशी मागणी रामभाऊ खिस्ते यांनी तहसीलदार व महावितरण कंपनीकडे केली आहे.याबाबत बोरी पोलीस ठाण्यात प्रताप खिस्ते यांच्या तक्रारीवरून महावितरण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यावर्षी अल्प पावसामुळे सोयाबीनच्या पेरणीचा खर्च उत्पादनातून निघत नसल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच अशा घटना घडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीfireआगFarmerशेतकरी