शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

परभणी : घनकचरा व्यवस्थापनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:00 AM

परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

१८ कोटी ८३ लाखांचा निधीलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून या प्रकल्पासाठी नुकताच १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधीही महापालिकेला प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.औरंगाबाद येथील कचऱ्याची समस्या राज्यभर गाजल्यानंतर महानगरपालिकांच्या शहरांमध्ये कचºयाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने महानगरपालिकांकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी आराखडा मागविला होता. दोन महिन्यांपूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. दरम्यान, राज्य शासनाने या आराखड्यानुसार १८ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी महापालिकेला प्रदान केला आहे. या निधीत १४ व्या वित्त आयोगातून परभणी महानगरपालिकेने ७ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर उर्वरित राज्य शासनाचा ४० टक्के आणि केंद्र शासनाचा ६० टक्के निधी मंजूर करण्यात आला आहे.नागरी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. परभणी शहरासाठी निधी मंजूर झाल्याने लवकरच या निधीमधून कामे केली जाणार आहेत. एकूण २९ बाबींवर ही कामे होणार आहेत. त्यात बायोमायनिंग प्रकल्प उभारणे, ३ कॉम्पॅक्टर, २ टिप्पर खरेदी करणे तसेच लोकांमध्ये जनजागृती, कर्मचाºयांचे प्रशिक्षण आदी बाबींवर या निधीमधून खर्च होणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.आचारसंहितेनंतर होणार कामेराज्य शासनाच्या नगरविकास विभागाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मंजुरी देत निधीही उपलब्ध करुन दिला आहे. सध्या परभणी जिल्ह्यात विधानपरिषदेची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाची प्रक्रिया सुरु होणार आहे. या प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या अंतर्गत करण्यात येणाºया कामांसाठी निविदा मागविल्या जाणार असून निविदा प्रक्रिया राबवून कामे केली जाणार आहेत.अधिकाºयांवर दिली प्रकल्पाची जबाबदारीमहापालिकेचे आयुक्त तथा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी मनपातील अधिकाºयांकडे विविध जबाबदाºयाही देण्यात आल्या आहेत. त्यात यांत्रिकी विभागप्रमुख मिर्झा तन्वीर बेग यांच्याकडे तांत्रिक स्वरुपाची जबाबदारी आहे. कनिष्ठ अभियंता शेख आर्शद यांच्याकडे बांधकामाच्या अनुषंगाने तर प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्यावर स्वच्छतेच्या संदर्भात जबाबदारी देण्यात आली आहे.कचºयाच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्नपरभणी शहरात सध्या जमा होणारा कचरा धाररोड येथील डपिंग ग्राऊंडवर साठविला जातो. स्वच्छता अभियानांतर्गत या कचºयाचे नैसर्गिकरित्या प्रक्रिया करण्याचा प्रकल्पही शहरात कार्यान्वित आहे. धाररोड परिसरातील डपिंग ग्राऊंड येथे जमा होणाºया कचºयापासून रासायनिक व गांडुळ खताची निर्मितीही केली जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साठलेला जुना कचरा रासायनिक पदार्थांच्या वापराने नष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सध्या कचºयाचा प्रश्न नसला तरी आगामी ५० वर्षात कचºयाची समस्या निर्माण होऊ नये, यादृष्टीने राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प शहरासाठी मंजूर केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका