शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गंगाखेड येथील टोळीप्रमुखासह सहा सदस्यांना केले हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:29 IST

गंगाखेड व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्यासह इतर सदस्यांना पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गंगाखेड व परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्यासह इतर सदस्यांना पोलीस अधीक्षकांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत़टोळीप्रमुख हरि उर्फ हरिदास लिंबाजी घोबाळे याच्याविरूद्ध जबरी चोरी करताना दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक हत्याराच्या सहाय्याने दुखापत करणे, प्राणघातक शस्त्रासह दंगा करणे आदी सुमारे २२ गुन्हे गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल आहेत़ तर या टोळीतील सदस्य सतीश लिंबाजी घोबाळे, शुभम उर्फ दादा दयानंद घोबाळे, दयानंद उर्फ भुऱ्या रुखमाजी घोबाळे, गोविंद उर्फ जयपाल लिंबाजी घोबाळे, रुपेश संजय वाव्हळे, संदीप उर्फ संदेश जयपाल कांबळे, अविनाश उर्फ महादेव लिंबाजी ओगले, रावसाहेब ज्ञानोबा नागरगोजे, वैभव उर्फ बाँड रोहिदास घोडके, अनिल माणिक कांबळे, राहुल माणिक कांबळे, शिवाजी संभाजी घोबाळे, शैलेश लिंबाजी ओगले या सदस्यांविरूद्ध एकूण ३१ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे़ त्यामुळे वरील आरोपींविरूद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून टोळीप्रमुख हरिदास लिंबाजी घोबाळे यास दोन वर्षांसाठी तर दयानंद घोबाळे, रावसाहेब नागरगोजे, वैभव घोडके यांना एक वर्षासाठी तसेच शुभम घोबाळे, गोविंद घोबाळे, सतीश घोबाळे यांना ६ महिन्यांसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ, परभणी तसेच बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर या तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक लोसरवाड, पोलीस हवालदार भारती, कांदे, कटारे यांनी टोळीप्रमुख व सदस्यांना नोटीस बजावून १४ एप्रिल रोजी रेणापूर व लातूर येथे नेऊन सोडले़ यापूर्वी पोलिसांनी लिंबाजी उर्फ विजय गोविंद घोबाळे व किरण उर्फ बाळू किशनराव घुंबरे यांची टोळीही हद्दपार केली आहे़ ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी़डी़ सैदाने यांनी केली़७ जणांचे हमीपत्र४या टोळीतील सदस्य रुपेश वाव्हळे, संदीप जयपाल कांबळे, अविनाश लिंबाजी ओगले, अनिल कांबळे, राहुल कांबळे, शिवाजी घोबाळे, शैलेश ओगले यांच्याकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या चांगल्या वर्तवणुकीचे हमीपत्र घेण्यात आले आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी