शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील स्थिती : गौण खनिज महागल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:41 IST

वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने वाळू वेळेवर उपलब्ध होत नाही. गिट्टी आणि मुरुम देखील महागल्याने जिल्ह्यात बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी या व्यवसावर अवलंबून असलेल्या सुमारे १५ हजाराहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने वाळू वेळेवर उपलब्ध होत नाही. गिट्टी आणि मुरुम देखील महागल्याने जिल्ह्यात बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी या व्यवसावर अवलंबून असलेल्या सुमारे १५ हजाराहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत आहे.यावर्षी वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. त्यामुळे वाळू खुल्या बाजारपेठेत उपलब्ध नाही. वाळूचे भाव गगणाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न धूसर होत आहे. १२०० रुपये ब्रास प्रमाणे मिळणारी वाळू सध्या २४ हजार रुपये प्रति ट्रक (तीन ब्रास) या दराने विक्री होत आहे. मुरुम आणि गिट्टीचाही कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे घरबांधकामांची प्रक्रिया ठप्प पडली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात घरकुुलांचे बांधकाम करण्यासाठीही प्रशासनाला उद्दिष्ट दिले आहे. या घरकुलांसाठी गौण खनिज उपलब्ध होत नसल्याने घरकुल बांधकामेही ठप्प आहेत. चोरट्या मार्गाने वाळू खरेदी करुन बांधकामे करावी लागत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही खर्च होत आहे.ग्रामीण भागातील घरकुलांसाठी माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते; परंतु, हे आश्वासनही कागदोपत्रीच राहिले आहे. वाळूसह मुरुम आणि गिट्टीचीही अशीच परिस्थिती आहे. २०० रुपये ब्रास दराने मिळणारा मुरुम ७०० ते ८०० रुपये दराने खरेदी करावा लागत आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये बांधकामे ठप्प पडल्याने या व्यवसायावर संकट कोसळले आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात हाताला काम लागत नसल्याने मजुरांचे स्थलांतर होत आहे.घरकुलांसाठीही मिळेना वाळू४घरकुलांच्या बांधकामासाठी प्रति लाभार्थ्याला लागणाऱ्या वाळूचाही प्रशासनाकडून पुरवठा होत नाही. टोकण पद्धत आणि प्रशासकीय कारवायांमध्ये वाळू उपलब्ध होणे जिकीरीचे झाले आहे. जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू देताना किचकट प्रक्रिया दूर करुन थेट लाभार्थ्याच्या घरकुलापर्यंत वाळू उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, सद्यस्थितीला लाभार्थ्यांनी वाळूची मागणी केली असताना अनेकांना वाळू उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरकुल बांधकामाबरोबरच पंचायत समिती, तहसीलच्या चकरा मारुन लाभार्थी त्रस्त होत आहेत.लक्षवेधी सूचना मांडणार४दरम्यान, जिल्ह्यामध्ये वाळू घाटाचे लिलाव झाले नसल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक बांधकाम कामगारांना काम उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामगारांचे स्थलांतरही वाढले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे बांधकाम कामगारांवर संकट ओढावले असल्याने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचा प्रश्न येत्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित करणार असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू