शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ग्रामस्थांचे एकजुटीने श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:11 IST

तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र तुफान आल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी):तालुक्यातील पाणी पातळी खालावल्याने व हिरवे रान वाळवंटासारखे होऊ लागल्याने गाव पाणीदार करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावागावांतील ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदानाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविला असून, सर्वत्र तुफान आल्याचे दिसत आहे.मागील काही वर्षांपासून तालुक्यात दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत आहे़ यामुळे सतत दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे़ या परिस्थितीवर मात करून तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी तालुक्यातील विविध गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवित एकजुटीने श्रमदानाच्या कामाला सुरुवात केली आहे.यामध्ये आरबुजवाडी, खादगाव, हरंगुळ, मरडसगाव, मालेवाडी, सुप्पा खालसा, सुप्पा जहागीर, डोंगरजवळा, गुंजेगाव, बडवणी, घटांग्रा आदी गावातील ग्रामस्थांनी पाणी फाउंडेशनमार्फत राबविल्या जाणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेत पावसाचा पाण्याचा थेंबन थेंब गावाच्या शिवारात अडवून जिरविण्यासाठी श्रमदानाच्या माध्यमातून सीसीटी, डीप सीसीटी खोदकाम, शेतातील बांध बंदिस्तीची कामे, वृक्ष लागवड करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्यातील अरबुजवाडी गावातील तरुण मंडळीसह अबालवृद्ध व महिला मोठ्या प्रमाणात श्रमदानाच्या कामात सक्रिय झाले असून, या कामासाठी लागणाºया जेसीबी मशीनच्या डिझेल खचार्साठी ग्रामस्थच लोकवर्गणी जमा करीत आहेत. येणाºया काळात हे गाव पाणीदार होईल, असा आशावादही व्यक्त केला जात आहे. ४५ दिवसांत गाव शिवारात श्रमदान करून पावसाचे पाणी पुढे वाहून जाऊ न देण्याचा संकल्पही ग्रामस्थ बोलून दाखवित आहेत.पावसाचे पाणी अडवून गाव परिसरात जिरवून गावाला पाणीदार करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. या गावांतील महिला, पुरुषांसह सर्वच जण श्रमदानासाठी सरसावले असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प