शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शाळेची भिंत पडून सात विद्यार्थिनी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:21 IST

शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक ऊर्दू शाळेची भिंत कोसळून चौथी वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक ऊर्दू शाळेची भिंत कोसळून चौथी वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना २७ आॅगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.उस्मानपुरा भागात जनसेवा बहूउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित हजरत अबूबकर सिद्दीकी प्राथमिक व माध्यमिक ऊर्दू शाळा आहे. पहिली ते सातवी वर्गापर्यंत या शाळेत जवळपास ३२४ विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास चौथी व पाचवीच्या वर्ग खोलीची भिंत बाहेरील बाजूस कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी शाळेकडे धाव घेतली. ही भिंत कोसळत असताना विटांचा मार लागून चौथी वर्गात शिक्षण घेणारी स. अंशीरा स. मोहसीन, खिजरा तालेब चाऊस, रुमैय्या नसीब खा, हुमेरा नसीबखाँ, फातेमाबी शेख अझहर, सुमैय्या फैजुल्ला खाँ, सानिया रहीम शेख या सात विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, इतर काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. शाळेची भिंत कोसळण्याची माहिती मिळताच अनेक पालकांनी शाळेकडे धाव घेतली. अनेकांनी पडलेल्याभिंतीचा ढिगारा उचलून त्याखाली विद्यार्थी अथवा वाटसरु दबलेले तर नाही ना, याची खात्री केली. मागील आठवड्यात शहरात दोन-तीन दिवस जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळेच भिंत कमकुवत होऊन पडली. याच वर्गाच्या समोरील बाजूची भिंतही पडण्याच्या मार्गावर असून, ती भिंत पाडून नवीन वर्ग खोल्या बांधाव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी