शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : विद्युत व्यवस्थापकांची निवड प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 00:58 IST

ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तातडीने विद्युत सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गतवर्षी महावितरण मार्फत मानवत तालुक्यातील ४५ गावांत विद्युत व्यवस्थापक नेमणूक करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर कोणत्याच गावात विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने ही निवड प्रक्रिया रखडली आहे.ग्रामीण भागामध्ये महावितरण कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या एकाच लाईनमनकडे अनेक गावे असतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी त्याला वेळेत त्या गावात जाता येत नाही. वेळोवेळी ही समस्या प्रकर्षाने पुढे आली आहे.ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणी दूर करणे, विजेमुळे होणारे अपघात रोखण्यासह वीजपुरवठा सुरळीत करून देण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ रोजी एक आदेश काढून ३ हजार लोकसंख्येच्या आतील गावच्या ग्रामपंचायत स्तरावर महावितरण कंपनीमार्फत ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावेत, असे सूचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून आयटीआयचा इलेक्ट्रीकल वायरमन ट्रेड उत्तीर्ण असलेल्या व पाच कि.मी. अंतराच्या आत राहणाºया उमेदवारांचे अर्ज मागविले होते.३४ ग्रामपंचायतींनी अर्ज मागविल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करून सर्व प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर केले. पंचायत समितीने महावितरणला हे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र महावितरणमार्फत कोणतीच कार्यवाही होत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.ग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत विविध कामे करण्यात येणार असून विविध समस्या तत्काळ स्थानिक पातळीवर सोडविल्या जाणार असल्याने या ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या तातडीने करण्याबाबत महावितरणने पुढाकार घेणे गरजेचे आहे.दुसरीकडे या प्रक्रियेला सात ते आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या रखडल्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची धाकधुक वाढली आहे.गावातच नोकरी मिळणार या आशेने अर्ज केलेला उमेदवार ग्रामपंचायत कार्यालयाकडे चकरा मारीत आहेत.११ ग्रा.पं.ला : मिळेना उमेदवारमानवत तालुक्यातील ३ हजार लोकसंख्येच्या ४५ ग्रामपंचायतींना जाहिरातीद्वारे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यापैकी ११ ग्रामपंचायतींना मात्र पाच कि.मी. अंतरा अंतर्गत आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सापडत नसल्याने या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव अद्यापही पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले नाहीत. दरम्यान, महावितरणकडे पाठविण्यात आलेल्या ३४ ग्रा.पं.च्या प्रस्तावा संदर्भात महावितरणकडे पं.स. कडून पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून अद्यापही प्रस्तावासंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात येत नाही.अशी आहेत विद्युत व्यवस्थापकाची कामेग्राम विद्युत व्यवस्थापकामार्फत गावातील मीटर रिडिंग घेणे, वीज देयकाचे वाटप करणे, ब्रेकडाऊन अहेड करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करणे, डीओ, फ्युज टाकणे, पथदिवे, नवीन जोडणी करणे, थकबाकी वसूल करणे, वीजपुरवठा बंद करणे यासारखी विविध कामे करण्यात येणार आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरण