शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

परभणीत १० जिवंत काडतुसांसह दोन पिस्तुले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:22 IST

या प्रकरणात एकूण चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

ठळक मुद्दे कारवाईची भनक लागल्याने तिनही आरोपींनी तेथून पलायन केले.एका जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाच्या बॅगमधून जप्त

परभणी : शहरातील जिंतूररोड परिसरातील एका जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाच्या बॅगमधून १० जिवंत काडतुसांसह दोन पिस्तुले पोलिसांनी १ जानेवारी रोजी रात्री जप्त केली. आहेत. या प्रकरणात एकूण चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

परभणी येथील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे यांचा वर्षभरापूर्वी खून झाला होता. या खूनप्रकरणातील आरोपी रवि गायकवाड हा एलएलबीची परीक्षा देण्यासाठी जामिनावर कारागृहातून सुटला आहे. आरोपी रवि गायकवाड हा १ जानेवारी रोजी दुपारी श्री शिवाजी विधी महाविद्यालयात परीक्षा देऊन परत येत असताना काही जण त्याचा खून करण्याच्या उद्देशाने त्याच्यावर पाळत ठेवत असल्याची माहिती त्याच्या सुरक्षेसाठी नियुक्त  पोलिसांना मिळाली. मात्र, कारवाईची भनक लागल्याने तिनही आरोपींनी तेथून पलायन केले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार व मनोज भगवानराव पंडित यांना जिंतूर रोडवरील एका जीममध्ये अटक करण्यात आली.

यावेळी फेरोज याच्या बॅगमध्ये काळ्या रंगाचे एक रिव्हॉल्वर, ६ काडतुसे तसेच एक गावठी कट्टा व ४ जिवंत काडतुसे मिळून आले. तसेच या प्रकरणात आरोपी बो ऊर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख यास त्याच्या राहत्या घरातून कोयता, खंजिरासह ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी बो ऊर्फ देवेंद्र श्रीनिवास देशमुख, शेख फेरोज शेख सलीम, सचिन अनिलराव पवार व मनोज भगवानराव पंडित आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसparabhaniपरभणीArrestअटक