शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:47 IST

शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज्ञ असल्याचे पहावयास मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये अग्निशमन यंत्र बसविले असले तरी हे यंत्र अद्यावत केले नसल्याने या शासकीय कार्यालयांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. विशेष म्हणजे अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करावी लागते, या विषयी अधिकारी अनभिज्ञ असल्याचे पहावयास मिळाले.शासकीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन काळात उपाययोजना करण्यासाठी आग नियंत्रण यंत्र बसविण्यात आले. शहरातील गजबजलेल्या प्रमुख कार्यालयांमध्ये हे यंत्र दिसून येते. मात्र संबंधित कार्यालय या यंत्राची व्यवस्थित देखभाल करीत नाहीत. पोलीस ठाणे, पशुवैद्यकीय दवाखाना, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय या कार्यालयांमध्ये आग नियंत्रण यंत्र बसविण्यात आहे; परंतु, या यंत्राची वैधता संपल्याचे पहावयास मिळाले. हे यंत्र अद्यावत करण्यासाठी संबंधित अधिकारी उदासिन असल्याचे चित्र आहे. भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना अग्निशमन यंत्राच्या वैधतेविषयी विचारले असता ते कधी करावे लागते, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. गटसाधन केंद्र, महावितरण कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय या कार्यालयात आग नियंत्रण यंत्रणाच नसल्याचे दिसून आले.आग आटोक्यात आणण्यासाठी सामुग्री उपलब्ध नसल्याने महत्त्वाचे दस्ताऐवज तसेच कार्यालयातील साधन सामुग्रीला धोका निर्माण झाला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ प्रमाणात दस्तऐवज असतात. मात्र या कार्यालयातील आग नियंत्रण यंत्रणा तीन वर्षापूर्वीच बाद झाली असून ती अद्यावत करण्यासाठी कार्यालयाने कोणतीच कार्यवाही केली नाही. इतर कार्यालयातील आग नियंत्रण यंत्राच्या वैधता संपल्याचे यंत्रणावरील तारखांवरून दिसून आले. बहुतांश शासकीय कार्यालयांच्या इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळविणारी सज्जता दिसून आली नाही. आपत्ती व्यवस्थापनाचा बागुलबुवा सर्वत्र उभा केला आहे. मात्र आपत्ती आली तरी व्यवस्थापन कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.पंचायत समितीची इमारत असुरक्षिततालुका कृषी कार्यालयाप्रमाणे पंचायत समितीचे कार्यालयाही असुरक्षित आहे. या कार्यालयात आग नियंत्रण यंत्रणा दिसून आली नाही. येथील इलेक्ट्रिक व्यवस्था निकामी झाली आहे. त्यामुळे या कार्यालयात केव्हाही आग लागू शकते. या ठिकाणी उपस्थित कर्मचाºयाकडे आग नियंत्रण यंत्राविषयी विचारणा केली तेव्हा हे यंत्र एका कक्षात ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. हा कक्ष उघडून दाखवा, असे सांगितल्यानंतर कक्षात मात्र यंत्र आढळले नाही. एकंदर पंचायत समिती कार्यालयाने आगीपासून सुरक्षिततेसाठी कोणतीही यंत्रणा उभी केली नाही. याबाबत गटविकास अधिकारी डी.बी. घुगे यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.तहसील, ग्रामीण रुग्णालयाने घेतली काळजीबहुतांश शासकीय कार्यालयातील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत केली नसल्याचे चित्र पहावयास मिळत असले तरी काही कार्यालयांनी आगीवर नियंत्रण मिळविणारी यंत्रणा अद्ययावत केली आहे. तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, वखार महामंडळ या कार्यालयांनी ही यंत्रणा अद्ययावत करून घेतली आहे. तत्त्कालीन तहसीलदार नीलम बाफना यांनी कार्यालयातील संपूर्ण यंत्रणा अपडेट केल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. वखार महामंडळाच्या गोदामात करोडो रुपयांचा शेतमाल ठेवला जात असल्याने या कार्यालयानेही संभाव्य धोका ओळखून ५ हजार लिटर पाण्याची टाकी भरून ठेवली आहे. ग्रामीण रुग्णालयातही आगीचा धोका होऊ नये, यासाठी यंत्रणा अपडेट केली आहे. आम्ही दरवर्षी ही यंत्रणा अद्ययावत करतो, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेंद्र वर्मा यांनी सांगितले.कार्यालयात आग नियंत्रण यंत्र बसविले नसल्याने आगीचा संभाव्य धोका होऊ शकतो. ही यंत्रणा लवकरच बसविण्यात येईल.-प्रताप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी, मानवत

टॅग्स :parabhaniपरभणीfireआग