शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुसऱ्या टप्प्यातील १६६ कोटी बँकेकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:20 IST

अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त झालेल्या १९१ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांपैकी १६६ कोटी २४ लाख ३४ हजार रुपये प्रत्यक्ष बँकेकडे वर्ग करण्यात आले असून, बँक प्रशासन प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे़परभणी जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते़ त्यात कापूस आणि सोयाबीन या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले़ या शेतकºयांना जिरायती पिकांसाठी ८ हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे शासनाने मदत जाहीर केली असून या मदतीचा पहिला टप्पा जिल्ह्यामध्ये वाटप झाला आहे़मागील आठवड्यात १९१ कोटी रुपयांच्या मदतीचा दुसरा टप्पा जिल्ह्याला प्राप्त झाला़ प्रशासनाने प्राप्त झालेली ही मदत तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केली़ त्यानंतर तहसीलस्तरावरुन मदतीची ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकºयांच्या यादीनिहाय बँकांकडे वर्ग केली असून, बँक प्रशासन आता प्रत्यक्ष खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया करणार आहे़ त्यामुळे दुसºया टप्प्यामध्ये बहुतांश शेतकºयांना मदत निधी प्राप्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे़ उपलब्ध झालेल्या माहितीनुसार परभणी तालुक्याने ३४ कोटी २१ लाख ८५ हजार रुपये, जिंतूर ३० कोटी ६२ लाख ४५ हजार, मानवत १५ कोटी ६१ लाख ९८ हजार, सोनपेठ ११ कोटी ६१ लाख ३० हजार, गंगाखेड २० कोटी ८२ लाख ३० हजार, पालम १७ कोटी ५८ लाख ५९ हजार अशी दुसºया टप्प्यातील संपूर्ण रक्कम शेतकºयांच्या यादीसह बँकेकडे वर्ग केली आहे़ सेलू तालुक्याला २१ कोटी ४१ लाख ८० हजार रुपये प्राप्त झाले होते़ त्यापैकी १६ कोटी ७८ लाख ६८ हजार रुपये (७८़३८ टक्के) आणि पूर्णा तालुक्याने २१ कोटी ६३ लाख ८८ हजार रुपयांपैकी १८ कोटी ९७ लाख १९ हजार रुपये (८७़६८ टक्के) बँकेकडे वर्ग केले आहेत़२ लाख शेतकºयांना मिळणार लाभ४अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांसाठी प्राप्त झालेल्या दुसºया टप्प्याची मदत सद्यस्थितीला बँकांकडे वर्ग केली असून, त्यातून १ लाख ९२ हजार ९९५ शेतकºयांच्या खात्यावर ही रक्कम नुकसानी प्रमाणे वर्ग केली जाणार आहे़४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ३६ हजार ४८३, सेलू १९ हजार ९३६, जिंतूर ३१ हजार १६६, मानवत १६ हजार ६५९, सोनपेठ १४ हजार ३४१, गंगाखेड २८ हजार ३६९, पालम २१ हजार ८८६ आणि पूर्णा तालुक्यातील २४ हजार १५५ शेतकºयांना बाधित पिकांच्या नुकसानीपोटी मदत मिळणार आहे़४त्यामुळे या शेतकºयांना आता अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात मदत जमा होणार आहे.तिसºया टप्प्याची प्रतीक्षाच !४अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतीचे दोन टप्पे जिल्ह्याला आतापर्यंत प्राप्त झाले आहेत. अजूनही अनेक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत. या जिल्ह्यात सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक शेतकºयांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन टप्प्यांचे वाटप झाल्यानंतरही मदतीपासून वंचित राहणाºया शेतकºयांना तिसºया टप्प्याच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरीbankबँक