शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

परभणी : हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:53 IST

पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़

सत्यशील धबडगे ।लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणाचा फटका तुरीच्या पिकाला बसला असून, उत्पादनात घट झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. दुष्काळाचा सामना करीत शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे़ बाजार समितीच्या मार्केट यार्डात मागील महिनाभरात १८०० क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव केंद्राविना तूर उत्पादकांची फरपट सुरूच असल्याचे पहावयास मिळत आहे़२०१७ मध्ये तालुक्यातील एकूण ३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तुरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले़ मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६६७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती़ पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने कृपा केल्याने शेतकरी समाधानी होता़ मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याने याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला़ अनंत अडचणींना तोंड देऊन १२ डिसेंबरपासून शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली़ सुरुवातीला तुरीला ४ हजार ७०० रुपये दर मिळाला होता़ त्यामुळे शेतकºयांत नाराजी दिसून येत होती़ निराशेचे वातावरण शेतकºयांत निर्माण झाले होते़ मात्र आता मागील आठवड्यापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत आहे़ तुरीला बाजारपेठेत ५ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे़ आतापर्यंत बाजारपेठेत १८०० क्विंटल आवक झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे़कापूस उत्पादकही हवालदिलकापूस वेचणीला दिवाळीच्या अगोदर सुरुवात झाली आहे़ दुष्काळामुळे कामाच्या शोधात अनेकांनी शहराकडे धाव घेतल्याने मजूर मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे़ जे मजूर उपलब्ध आहेत ते वेचणीसाठी जास्तीचा दर मागत आहेत़ ८ ते १० रुपये प्रतिकिलो मजुरी द्यावी लागते़दुसरीकडे कापसाला चांगला दर मिळेल, या आशेने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकडे पाठ फिरविली आहे़ सुरुवातीच्या काळात कापसाचा दर ६ हजारापर्यंत गेला होता़ मागील आठवड्यात ५ हजार ६८० रुपये कापसाला वरचा दर मिळाला होता़ मात्र तो आता ५ हजार ५७० रुपयांपर्यंत घसरला आहे़ १०० रुपयांनी भाव तुटले आहेत़१२ जानेवारी रोजी ५ हजार ५७० रुपयांचा कापसाला वरचा दर मिळाला़ यामुळे शेतकरी निराश झाले आहेत़ भाव कमी-जास्त होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकरी वाट बघत होते़ मात्र प्रत्यक्षात भाव वाढ होत नसल्याने शेतकरी आपला कापूस विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी