शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :उरुसात पकडला सराईत चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:55 IST

येथील उरुसामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री एका सराईत चोरट्याला अटक केली आहे़ या चोरट्याने ४ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील उरुसामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी रात्री एका सराईत चोरट्याला अटक केली आहे़ या चोरट्याने ४ ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे़शहरामध्ये सय्यद हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या उरुसाला प्रारंभ झाला असून, या उरुसात दर्शन व खरेदीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दाखल होतात़ भाविकांची संख्या वाढल्याने उरुस काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे़ तसेच पेट्रोलिंगही वाढविली आहे़ ४ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक उरुसात गस्त घालत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी या ठिकाणी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता, एकूण ४ गुन्ह्यांमध्ये या आरोपीचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे़ मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपीने चोरी केली होती़ या चोरी प्रकरणातील तीन ग्रॅम वजनाची अंगठी, ५ ग्रॅम सोन्याचे कानातील झुंबर आणि नगदी २६ हजार रुपये असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या आरोपीने जिंतूर कोतवाली आणि सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली़ दरम्यान,गुन्हा घडला त्यावेळी हा आरोपी अल्पवयीन होता़ आता तो सज्ञान असल्याचेही पोलिसांनी सांगितले़आरोपीस मानवत पोलीस ठाण्यात हजर केले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर हे तपास करीत आहेत़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे यांच्या पथकाने पार पाडली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी