शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदावरीच्या पात्रात रात्रभर वाळूचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:45 IST

तालुक्यात डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीचे पात्र जागोजाग कोरडे पडले आहे. याचा फायदा घेत वाळू चोर सक्रीय झाले आहेत. रात्रभर गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल विभागाच्या पथकाला हुलकावणी देत वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम : तालुक्यात डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीचे पात्र जागोजाग कोरडे पडले आहे. याचा फायदा घेत वाळू चोर सक्रीय झाले आहेत. रात्रभर गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल विभागाच्या पथकाला हुलकावणी देत वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे.पालम तालुक्यात गोदावरीच्या नदीचे पात्र मोठे आहे. डिग्रस बंधाऱ्यात डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पात्रातील वाळू उघडी पडली आहे. जागोजाग पात्रात पाणी नसल्याने वाहने रात्रभर फिरत आहेत. पालम, पूर्णा तालुक्यातील दोन्ही बाजूनी वाळू चोरांचे मोठे रॅकेट सक्रीय झालेले आहे.रात्री १२ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत वाळूचा सर्रास उपसा केला जात आहे. महसूल विभागातील पथक रात्री-बेरात्री फिरत असले तरीही या पथकाला हुलकावणी दिली जात आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी जागोजागी महसूल पथकाचा सुगावा लागण्यासाठी माणसे नेमली आहेत. महसूलच्या कर्मचाऱ्यांवर बारिक नजर ठेवली जात आहे.कर्मचारी येत असल्याची चाहूल लागताच गोदावरीच्या पत्रातून वाहने बाहेर काढली जात आहेत. वाहने गोदाकाठच्या शिवारात आजूबाजूला लपविली जात आहेत. महसूल कर्मचाºयांना नदीपात्रात वाळू उपसा करणारी वाहने दिसत नसल्याने पथकाला रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.महसूल पथक परत जाताच पुन्हा वाळूमाफियांकडून रात्रभर वाहनामार्फत वाळू उपसा करून हजार रुपयांना वाळू विकली जात आहे. त्यामुळे गोदाकाठची गावे वाळू चोरांना कंटाळली आहेत. ग्रामस्थ गाढ झोपेत असतानाच ही वाहने नदीपात्रांमध्ये दाखल होत आहेत.पहाटे लवकरच वाळू घेऊन पसार होत आहेत. याकडे जिल्हा महसूल पथकाने लक्ष देऊन वाळू माफियांना लगाम घालावा, अशी मागणी पालम तालुक्यातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.पथकाला केले जाते ‘मॅनेज’४अवैध वाळूची चोरी करणारी वाहने पकडण्यासाठी महसूल विभागाने पथके तैनात केली आहेत. या पथकातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी यांचे वाळू तस्करांशी लागेबांधे प्रस्थापित झाले आहेत. यामुळे वरिष्ठ अधिकारी येत असल्याची कुणकुण वाळूमाफियांना लवकर लागत आहे. त्याच बरोबर वाळू चोरणारी वाहने पकडूनही जागेवरच तोडीपाणी केले जात असून महसूलच्या पथकालाही मॅनेज केले जात असल्याने वाळू चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.निवडणुकीच्या कामामुळे वाळूमाफिया सक्रिय४लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे सुद्धा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने वाळू चोरांना मोठी संधी चालून आली आहे. याचाच फायदा घेत वाळू चोर गोदापात्रातील वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळू