शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : प्रादेशिक वैद्यकीय आरक्षण विरोधात संभाजी सेनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:22 IST

वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या अनुषंगाने संभाजी सेनेच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाडा, विदर्भ अािण रेस्ट आॅफ महाराष्टÑ असे तीन विभाग पाडले आहेत. त्यात स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के आणि उर्वरित ३० टक्क्यांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिले जातात. मात्र मराठवाड्यात केवळ ५ वैद्यकीय महाविद्यालये असून, ८०० जागा आहेत. तर दुसरीकडे विदर्भात ८ वैद्यकीय महाविद्यालय व १४०० जागा आणि रेस्ट आॅफ महाराष्टÑमध्ये २३ वैद्यकीय महाविद्यालये व ३९५० जागा आहेत. मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने या फॉर्म्युल्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी ७०:३० चा फॉर्म्युला रद्द करावा, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. संभाजी सेनेच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी केलेल्या आंदोलनात विज्ञान विषयाचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांसह संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, सुभाष जावळे, प्रा.के.पी. कनके, सोनाली देशमुख, डॉ.उद्धवराव देशमुख, विठ्ठलराव तळेकर, विजयराव जाधव, माधवराव थिटे, रवि तांबे, समीर खान जमाल खान, प्रकाश काळदाते, सय्यद इब्राहीम, डॉ.संदीप काला, डॉ.बी.ए:म. मोरे, प्रा.राजेश सुरवसे, डॉ.मारोती हुलसुरे, प्रा.सुनील जाधव, प्रा.जैस्वाल आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :parabhaniपरभणीMedicalवैद्यकीयagitationआंदोलन