शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दररोज होतेय ३ हजार ऊस वाढ्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:39 IST

यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.

राजू पठाडे।लोकमत न्यूज नेटवर्कताडबोरगाव (परभणी) : यंदाच्या हंगामात जेमतेम पाऊस झाल्याने परिसरात चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून ताडबोरगाव व परिसरामध्ये दररोज तीन हजार वाढ्यांची (ऊस) विक्री होऊ लागली आहे.कडवळ, मका, संकरित ज्वारी आणि चराईसाठी कुठेही गवत उगवले नसल्याने परिसरात हिरवा चारा शिल्लक नाही. सोयाबीनचे थोडेफार भूस होते, तेही संपत आले आहे. त्यामुळे पशूपालकांसमवेत चाºयाचा गंभीर प्रश्न उभा टाकला आहे. विकत चारा घेऊन जनावरांचे पालन-पोषण करण्याची वेळ पशूपालकांवर ओढावली आहे.यंदाच्या संपूर्ण पावसाळी हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परिणामी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न आतापासूनच निर्माण झाला आहे. पशूधन सांभाळणे अवघड झाले असून दररोज शेतकºयांना चारा विकत घ्यावा लागत आहे. सध्या उसाची तोडणी सुरु असून या उसाचे वाढे विक्रीला येत आहेत. ताडबोरगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ्यांची विक्री होत आहे.जनावरांचे पालन-पोषण करण्यासाठी पशूपालकांनी वाढ्याला पसंती दिली असून दररोज सुमारे ३ हजार वाढ्यांची या भागात विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणे जिकरीचे झाले आहे.रब्बी ज्वारीवरही संकटअनेक शेतकºयांनी उपलब्ध पाण्यावर चाºयासाठी ज्वारीची पेरणी केली आहे. त्यावरही आता लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाला असून या अळीने पाते, पोंगे कुरतडून नुकसान केले आहे. यामुळे ज्वारी, मका ही पिके हाती लागणार नसून चाºयाचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत.शेतीला जोड म्हणून म्हैस घेऊन दुध व्यवसाय सुरु केला; परंतु, ओला चारा नसल्याने दररोज विकतचा चारा घ्यावा लागत आहे. परिणामी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.-संतोष पठाडे, शेतकरीअत्यल्प पावसाळामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात.-सुनिता पठाडे, सरपंच

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसFarmerशेतकरी