शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबईच्या आंदोलकांसाठी परभणीकरांची घरची गोडधोड शिदोरी; ७५ हजार किट्स आंदोलनस्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 19:23 IST

परभणीकर मैदानात! मुंबईतील आंदोलकांसाठी पाठवल्या घरच्या शिदोरीच्या ७५ हजार किट्स

परभणी : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या बांधवांच्या जेवण्याची गैरसोय होऊ नये, यासाठी परभणी जिल्ह्याने एकजुटीचे दर्शन घडवले. सोमवारी पहाटे परभणीतून रवाना झालेले चार टन जेवणाचे साहित्याच्या ७५ हजार किट्स दोन ट्रकमधून आझाद मैदानावर पोहोचल्या.

जिल्ह्यातील समाजबांधवांनी जबाबदारीची भावना जपत आंदोलनकर्त्यांसाठी आवश्यक शिदोरी उपलब्ध करून दिली. भाकरी, ठेचा, चटणी, लोणचं, कांदा, तसेच सणासुदीचे गोडधोड पदार्थ यात समाविष्ट असल्याने आंदोलनकर्त्यांना घरगुती जेवणाचा आस्वाद मिळाला. या साहित्यामुळे उपोषणस्थळी गेल्या चार दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या मराठा बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. २९ ऑगस्टपासून मुंबईत सुरू झालेल्या या उपोषणासाठी परभणी जिल्ह्यातील युवकांनी २७ ऑगस्टपासूनच आंतरवली सराटीकडे कूच सुरू केली. त्यानंतर दररोज हजारो वाहनांमधून मराठा समाजबांधव मुंबईत पोहोचू लागले. गणेशोत्सव आणि महालक्ष्मीच्या सणाच्या दिवसांतही समाजातील तरुणांनी सणाला दुय्यम स्थान देत लाखोंच्या संख्येने आझाद मैदानावर ठिय्या दिला आहे. १ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव आंदोलनस्थळी दाखल झाले असून, या लढ्याला भक्कम ताकद मिळाली आहे.

समाजाच्या एकतेचे दर्शनआंदोलनकर्त्यांची शिदोरीसाठी परभणीत खास मदत कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले की, “प्रत्येक घरातून दहा भाकऱ्या, ठेचा, चटणी, कांदा, लोणचं आणि सणासाठी गोडधोड कार्यालयात जमा करावे.” या आवाहनाला जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. काही तासांतच प्रचंड प्रमाणात साहित्य जमा झाले. परभणीकरांनी पुन्हा एकदा आपली उदारता सिद्ध केली आणि समाजाच्या एकतेचे दर्शन घडवले.

दोन ट्रकमधून सोमवारी पोहोचले मुंबईतजमा झालेल्या साहित्याचे नियोजन करून कार्यकर्त्यांनी पद्धतशीर तयारी केली. भाकरी, चटणी, लोणचं, कांदा आणि गोडधोड यांचे मिश्रण करून ७५ हजार किट्स तयार करण्यात आल्या. या किट्स रविवारी उशिरा रात्री दोन मोठ्या ट्रकमधून मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. सोमवारी पहाटे हे ट्रक आझाद मैदानावर दाखल झाले आणि आंदोलनकर्त्यांच्या हाती जेवणाच्या पिशव्या पोहोचल्या.

समाजमाध्यमातही आरक्षणाचाच बोलबालादरम्यान, जिल्ह्यातील अनेक गावे व शहरांतून अजूनही मराठा बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत. सोशल मीडियावरूनही जिल्ह्यातील तरुण शासनावर दबाव आणत आहेत. फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि विविध डिजिटल माध्यमांतून आंदोलनाचे फोटो व व्हिडीओ शेअर करून आरक्षणाच्या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणparabhaniपरभणी